---Advertisement---

काय सांगता! एका चेंडूत तीनदा रनआउटपासून वाचले फलंदाज, पाहा व्हिडिओ

On: रविवार, जून 15, 2025 1:11 PM
---Advertisement---

फील्डिंग क्रिकेटचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. एक चांगला झेल, एक थेट थ्रो सामना फिरवू शकतो. पण TNPL 2025 मधील एका सामन्यात फील्डिंगची अत्यंत हास्यास्पद चूक झाली. डिंडीगुल ड्रॅगन्स आणि सीचेम मदुरै पँथर्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका चेंडूवर फलंदाज तिनदा रनआउट होण्यापासून वाचले.

सामन्याचा शेवटचा म्हणजे 20वा ओव्हर सुरू होता. सीचेम मदुरै पँथर्सकडून गुरजपनीत सिंग आणि एस. राजालिंगम फलंदाजी करत होते. गुरजपनीतने एक चेंडू थेट रविचंद्रन अश्विनकडे खेळला. अश्विनने बॉलरकडे थ्रो केला, पण चेंडू स्टंपपासून दूर गेला बाॅलरने चेंडू पकडला नाही. फलंदाजांनी पहिला धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या फील्डरने विकेटकीपर बाबा इंद्रजीतकडे थ्रो केला, पण तोही चेंडू पकडण्यास चुकला आणि दुसरी धाव मिळाली. नंतर पुन्हा बॉलरकडे थ्रो आला, पण तोही अचूक नव्हता आणि फलंदाजांनी तिसरी धावही पूर्ण केली.

या सगळ्या गोंधळामुळे अश्विन अत्यंत निराश झाला. त्याचा रागही स्पष्ट दिसत होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्सने शानदार खेळ करत 9 विकेट्सने विजय मिळवला. सीचेम मदुरै पँथर्सने प्रथम फलंदाजी करत 150 धावा केल्या. त्यांच्याकडून अतीक उर रहमानने सर्वाधिक 50 धावा केल्या. प्रत्युत्तरात डिंडीगुलसाठी शिवम सिंगने केवळ 41 चेंडूत 86 धावा केल्या, ज्यामध्ये 8 चौकार आणि 6 षटकार होते. अश्विननेही 49 धावांची खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---