वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये झाली. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या चालू हंगामात सुरुवातीचे प्रत्येकी दोन-दोन सामने खेळले आणि जिंकले आहेत. मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध खेळायचा आहे. विश्चषकातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताची फलंदाजी भक्कम असल्याचे दिसून आले. अशात पाकिस्तानचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी खास सराव करत आहेत.
या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय फलंदाजांना सामोरे जाण्यासाठी ‘ओल्ड स्कूल’ पद्धतीचा अवलंब केला आहे. गुरुवारी पाकिस्तानी फिरकीपटू स्पॉट बॉलिंगचा सराव करताना दिसले. हे एक असं तंत्र आहे जे बऱ्याच वर्षांपूर्वी वापरले गेले होते. हा हाय व्होलटेज सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानाची आसन क्षमता 1 लाख 32 हजार असल्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी 14 ऑक्टोबरला होणाऱ्या महत्वपुर्ण सामन्यासाठी गुरुवारी ‘स्पॅाट’ गोलंदाजीचा कसून सराव केला. या गोलंदाजांनी फलंदाजांना गोलंदाजी न करता गोलंदाजी प्रशिक्षक मॅार्ने मॅार्केलच्या निरीक्षणाखाली नेटमध्ये गोलंदाजी केली. अशी गोलंदाजी अगोदरच्या काळात केली जायची. पाकिस्तानी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांसाठी हा जुना पर्याय निवडला आहे.
मॅार्केलने सहा मिटर अंतरावर दोन्ही बाजूला प्लास्टिक स्टंप लावले आणि त्यामध्ये एक लाल कलरचा कोन ठेवून गोलंदाजांना अचुक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सांगितले. यामध्ये शादाबने अचुक गोलंदाजी केली, परंतु नवाजला अचुक टप्प्यावर गोलंदाजी करता आली नाही. याव्यतिरिक्त गोलंदाजांनी क्षेत्ररक्षणाचाही कसून सराव केला.
वनडे विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला अद्याप भारताला पराभूत करता आलेले नाही. आयसीसीच्या या स्पर्धेत भारताने 7 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. हा विक्रम सुधारण्यावर भारताचे लक्ष असेल, तर पाकिस्तानचा येथे पहिला विजय नोंदविण्याचे लक्ष्य असेल. (To face India Pakistan adopted the old method practicing spot bowling)
महत्वाच्या बातम्या –
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून परतलेल्या कबड्डी संघातील खेळाडू स्नेहल शिंदेची उस्फूर्त मिरवणूक
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत राधिका कानिटकरला तिहेरी मुकुट