भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल. त्याआधी भारतीय संघाकडे पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या चुका सुधारण्याची संधी आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने वनडे मालिकेत भारतीय फलंदाजांचा चांगलाच घाम काढल्याचे दिसते. अशात बुधवारी (22 मार्च) सुरू होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात संघाला स्टार्कविरुद्ध खेळण्यासाठी खास रणनीती तयार करावी लागेल. पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये स्टार्कने 8 विकेट्स घेतल्या आहेत. अशात तिसऱ्या सामन्यासाठी संघाला स्टार्कवर पर्याय म्हणून मार्ग शोधावा लागणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, आणि सूर्यकुमार यादव यांना स्टार्कविरुद्ध खेळताना विकेट राखून ठेवावी लागेल.
भारतात मर्यादित षटकांचा सामना सपाट/ पाटा खेळपट्टीवर खेळला जातो. अशा खेळपट्टीवर फलंदाजाला जास्त फुटवर्कची गरज भासत नाही. फ्रंटफूटवर खेळून फलंदाज अशा खेळपट्टीवर चांगले प्रदर्शन करू शकतो. पण स्टार्कने मात्र वनडे मालिकेत हे सर्व नियम चुकीचे ठरवले आहेत. त्याने टाकेलला चेंडू एकतर मिडल स्टंम्पवल लागला किंवा लेग मिडलकडे. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी स्टार्कपुढे गुडघे टेकले. मुंबईत स्टार्कला खेळपट्टीने साथ दिली, तर विशाखापट्टणमध्ये समुद्र जवळ असल्याने हवेद ओलावा होता. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मात्र मोठ्या काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. अशात नवीन खेळपट्टी कशी असेल, सामना सुरू झाल्यानंतरच पाहायला मिळेल.
चेपॉक स्टेडियमवर शक्यतो फिरकी गोलंदाजांना मदत मिळाल्याचे यापूर्वी पाहिले गेले आहे. मधल्या षटकांमध्ये फलंदाजांसाठी धावा करणे कठीण असते. यावेळी मात्र चेन्नई सुपर किंग्जची ताकत लक्षात गेऊन खेळपट्टी तयार केली गेली आहे. अशात सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना याठिकाणी मदत मिळू शकते. भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीच्या कारणास्तव संघातून बाहेर आहे. अशात सूर्यकुमार यादवला पहिल्या दोन वनडेमध्ये संधी मिळाली, पण सूर्यकुमार या दोन्ही सामन्यांमध्ये शुन्यावर बाद झाला. सूर्यकुमारने जर येत्या काळात चांगले प्रदर्शन केले, तर आगामी वनडे विश्वचषकात देखील त्याला संधी मिळू शकते.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना अवघी 47 षटके गोलंदाजी करता आली. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. अशात शार्दुल ठाकुर आणि जयदेव उनाडकट यांच्यातील कुणाला संधी मिळते, हे पाहावे लागेल. तसेच संघ व्यवस्थापनाकडून रविंद्र जडेजासह कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांनाही संधी दिली जाऊ शकते.
(to win the third ODI match, India will have to plan a special strategy against Mitchell Starc)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या हंगामातील विराट अन् स्मृतीची निराशाजनक आकडेवारी, वाचून RCBच्या चाहत्यांचंही दुखेल मन
‘मोदी साहेब, प्लीज दोन्ही देशात…’, शाहिद आफ्रिदीने मोदींपुढे पसरले हात, सविस्तर बातमी वाचाच