---Advertisement---

५ चेंडूत २ धावा हव्या असताना आणि ४ विकेट्स बाकी असतानाही संघ हरला, जाणून घ्या कसा

On: गुरूवार, मार्च 7, 2019 7:42 PM
---Advertisement---

तिरुअनंतपुरम। आज(7 मार्च) 19 वर्षांखालील चौरंगी मालिकेत 19 वर्षांखालील भारतीय ब संघा विरुद्ध 19 वर्षांखालील दक्षिण आफ्रिका संघात वनडे सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 1 धावेने विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारताने दिलेल्या 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला शेवटच्या 5 चेंडूत 2 धावांची गरज होती. तसेच 4 विकेट्स त्यांच्या हातात होते. पण दक्षिण आफ्रिकेच्या तीन विकेट्स एकही धाव न घेतला 5 चेंडूत गेल्याने हा सामना त्यांना एका धावेने पराभूत व्हावा लागला.

या शेवटच्या षटकात रुआन टेरब्लांचे, जारेद जारदिन आणि नोनेलेला यीखा या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे या तिन्ही विकेट्स या धावबादच्या रुपाने गेल्या. त्यांना भारताच्या अनुक्रमे राहुल चंद्रोल, प्रयास बर्मन आणि सुशांत मिश्रा यांनी धावबाद केले.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून टेरब्लांचे आणि अँडिल मोक्गकेनने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या समीप पोहचवले होते. टेरब्लांचेने 73 आणि अँडिलने 64 धावा केल्या होत्या. तर भारताकडून सुमीत जुआल आणि करन लाल यांनी प्रत्येकी 2 आणि सुशांत मिश्रा आणि प्रभात मौर्य यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून प्रग्नेश कानपिल्लेवारने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर समीर रिझवीने 40 धावा केल्या होत्या. भारताला 49.1 षटकात सर्वबाद 198 धावा करता आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

दुसऱ्या वनडेत ग्लेन मॅक्सवेलने केली फेक फिल्डिंग, पंचांनी केली नाही कोणतीही शिक्षा

धोनीची ती बाजू जगासमोर, दादा आपल्याच घरी कसलं आलंय उद्धाटन

धोनी आणि चाहत्याच्या त्या पकडापकडीच्या खेळामुळे वाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment