---Advertisement---

आज चेन्नई-मुंबई आमने-सामने; धोनीच्या चेन्नई संघासाठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती

On: शुक्रवार, ऑक्टोबर 23, 2020 12:10 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 41 वा सामना शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. आज(23 ऑक्टोबर) रात्री 7.30 वाजता सामना सुरु होईल. चेन्नईसाठी करो किंवा मारोची स्थिती असेल. त्याचबरोबर मुंबईला हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठायचे आहे.

प्ले ऑफसाठी चेन्नईला उर्वरित सर्व चार सामने जिंकावेच लागणार आहे. याशिवाय स्पर्धेतील उर्वरित संघांच्या कामगिरीनुसार चेन्नईचे भवितव्य निश्चित होईल. दुसरीकडे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला मुंबई संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ निश्चित झाले आहे.

सलामीच्या सामन्यात मुंबईचा झाला होता पराभव

सलामीच्या सामन्यात (19 सप्टेंबर) चेन्नईने सामन्यात मुंबईला 5 विकेटने पराभूत केले होते. अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला 163 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 19.2 षटकांत 5 गडी गमावून सामना जिंकला होता.

मुंबई आहे उत्कृष्ट फॉर्ममध्ये

सलामीचा सामना गमावल्यानंतर मुंबईने स्पर्धा चांगलीच गाजवली. मुंबई हा एकमेव असा संघ आहे ज्याने आपल्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये सर्वात कमी बदल केले आहेत. मुंबईने हंगामात 9 सामने खेळले असून 6 विजय मिळवले आहे आणि 3 सामने गमावले आहेत.

मुंबईचा 2 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये झाला पराभव

मुंबईने सुपर ओव्हरमध्ये या हंगामात 2 सामने गमावले आहेत. पहिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आणि दुसरा किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध. पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्याचा निकाल 2 सुपर सुपर ओव्हरनंतर लागला.

चेन्नई संघ आहे खराब फॉर्ममध्ये

चेन्नईने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर सतत त्यांचा पराभव झाला. चेन्नईकडून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात संघ खराब कामगिरी करत आहे. दिग्गज खेळाडू रैना आणि हरभजनची उणीव इतर कुठल्याही खेळाडूला भरून काढता आलेली नाही. आता अनुभवी अष्टपैलू ब्राव्होनेही दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईकडून केल्या सर्वाधिक धावा

मुंबईचे सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. हंगामात डिकॉकने 322 आणि रोहितने आतापर्यंत 260 धावा केल्या आहेत. याखेरीज सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 243 धावा केल्या आहेत.

मुंबईचे गोलंदाज आहे फॉर्ममध्ये

मुंबईचे वेगवान गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. या सत्रात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या दहा गोलंदाजांच्या यादीत आहेत. बुमराहने 15 तर बोल्टने 12 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर, फिरकीपटू राहुल चाहरने या हंगामात आतापर्यंत 11 बळी घेतले आहेत.

चेन्नईकडून चाहर-करनने घेतले प्रत्येकी 10 बळी

चेन्नईकडून वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 10-10 बळी घेतले आहेत. यानंतर शार्दुल ठाकूर 9 बळींसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती

शारजाहमध्ये आकाश स्वच्छ होईल. तापमान 22 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. शारजाहमध्ये आयपीएलपूर्वी झालेल्या मागील 13 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 69% होता.

या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने : 13
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 9
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 4
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 149
दुसर्‍या डावात सरासरी धावसंख्या: 131

आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर आहे सर्वाधिक

आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर 59.48% आहे. सीएसकेने आतापर्यंत एकूण 175 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 103 सामने जिंकले आहेत आणि 71 सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित होता. त्याचवेळी मुंबईचा विजय मिळवण्याचा दर 58.67% आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 196 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 115 सामने जिंकले आणि 81 सामने गमावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘पराभवामुळे मनोबल खचले, तरीही आयपीएलचा अंतिम सामना खेळू याचा विश्वास’, दिग्गजाने दिली प्रतिक्रिया

छा गये पांडेजी ! राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर ट्विटरवर मनीष पांडेच्याच नावाचा कल्ला

धोनी, युवराज, रैना बिग बॅश लीगमध्ये खेळणार?

ट्रेंडिंग लेख –

स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून

नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर

आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---