---Advertisement---

टीम इंडिया आणि एमएस धोनीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली ही घटना…

On: रविवार, मार्च 10, 2019 1:59 PM
---Advertisement---

मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज चौथा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आज त्याच्याऐवजी रिषभ पंतला 11 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर भारतीय संघ धोनीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या अनुपस्थितीत वनडे सामना खेळत आहे.

धोनीने 23 डिसेंबर 2004ला बांगलादेश विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर आजचा सामना मिळून भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 55 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 54 वनडे सामन्यात धोनीचा भारताच्या 11 जणांच्या संघात समावेश होता.

धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या 54 वनडे सामन्यात 45.36 च्या सरासरीने 1633 धावा केल्या आहेत. यात 2 शतकांचा आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच धोनीने या 54 सामन्यातील 40 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील 14 सामन्यात भारताने विजय मिळवले आहे, तर 21 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

चौथ्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

एवढं चांगल खेळत असूनही कोहलीसमोर आहे हे मोठं संकट

सगळ्या पाकिस्तानच्या खेळाडूंएवढ्या सेंच्युरी केल्यात एकट्या किंग कोहलीने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment