---Advertisement---

क्रिकेटमधील हे १० हटके स्टॅट्स आजचा तुमचा दिवस करतील खास, पहा

On: गुरूवार, ऑगस्ट 27, 2020 2:53 PM
---Advertisement---

क्रिकेटमधील काही खास विक्रम-

#१. वनडे पदार्पणात शतक करणारा केएल राहुल हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.

#२. तब्बल १२९ कसोटी डावांत राहुल द्रविडने १०० किंवा अधिक चेंडूंचा सामना केला आहे.

#३. आयपीएलमध्ये जलद १००० व २००० धावांचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने १००० धावा ३१ तर २००० धावा ६३ डावांत केल्या होत्या.

#४. दोन वेगवेगळ्या मैदानांवर कसोटीत २००० किंवा अधिक धावा करणारा माहेला जयवर्धने हा एकमेव खेळाडू आहे.

#५. तीन वेगवेगळ्या क्षेत्ररक्षकांच्या मदतीने वनडेत हॅट्रिक विकेट घेणारे गोलंदाज
थिसारा परेरा, कुलदीप यादव, स्टिव फिन

#६. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेथन लायन या गोलंदाजांना तब्बल १२ षटकार मारले आहेत.

#७. एकाच वनडे मालिकेत सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

#८. ७ सामन्यांची वनडे मालिका- झहिर खान- ३५५ धावा
#९. ५ सामन्यांची वनडे मालिका- भुवनेश्वर कुमार- ३४७ धावा

#१०. एकाच वर्षात वनडेत १०००+ धावा व ४०+ विकेट्स घेण्याचा पराक्रम जॅक कॅलिसने दोन वेळा केला आहे.
अन्य कोणत्याही खेळाडूला हा पराक्रम एकदाही जमला नाही.

#११. आयसीसीच्या स्पर्धांत सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
२७१९- सचिन तेंडूलकर
२३३६- विराट कोहली
२१३२- रोहित शर्मा
१७०७- युवराज सिंग

#१२. कर्णधार असताना कसोटी मालिकेत दोन वेळा ७०० किंवा अधिक धावा करणारे सर डाॅन ब्रॅडमन हे एकमेव खेळाडू आहेत.

#१३. कसोटी व वनडेत प्रत्येकी २५ किंवा अधिक शतके करणारे फलंदाज
सचिन तेंडूलकर
रिकी पाॅटींग
कुमार संगकारा
हशिम आमला
विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---