---Advertisement---

आशिष कुमारच्या पराभवासह पुरुष बॉक्सिंगमधील भारताच्या आशांना पूर्णविराम; चीनच्या बॉक्सरने दिली मात

---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय बॉक्सर्सला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. या ऑलिंपिकच्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष बॉक्सिंगमधील ७५ किलो मध्यम वजनी गटातील राऊंड ३२ चा सामना पार पडला. या साामन्यात भारताच्या आशिष कुमारला चीनच्या एरबिएक टोहेटाने ५-० ने पराभूत केले आहे.

पुरुष बॉक्सिंगमध्ये पदकाच्या शर्यतीतून बाहेर होणारा आशिष हा तिसरा भारतीय बॉक्सर आहे. त्याच्यापूर्वी विकास कृष्ण आणि मनीष कौशिकलाही पराभवाचा साामना करावा लागला होता. विजेंदर सिंगनंतर पहिल्यांदाच कोणताही भारतीय बॉक्सर मध्यम वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र, आशिष कुमारला विजेंदरसारखी कामगिरी करण्यात अपयश आले. (Tokyo Olympic Ashish Kumar Fight With Chainas Erbieke Tuoheta In The 75 KG Middleweight Category)

टोकियो ऑलिंपिकमध्ये पदार्पण केलेला आशिष एकदाही परीक्षकांच्या अपेक्षांनुसार कामगिरी करू शकला नाही. तिन्ही राऊंडमध्ये ५ परीक्षकांचा निर्णय त्याच्या विरुद्ध होता. तरीही, पहिला राऊंड पराभूत झाल्यानंतर, त्याने आपला दबदबा दाखवला. मात्र, तो परीक्षकांना प्रभावित करू शकला नाही. यानंतर तिसरा राऊंड पुन्हा एकदा चीनचा बॉक्सर टोहेटाने आपल्या नावावर केला.

आता टोहेटाचा पुढील सामना ब्राझिलियन बॉक्सर हेबर्ट कॉन्सिआनोसोबत येत्या गुरुवारी (२९ जुलै) होईल.

आशिषने सन २०१९ मध्ये एशियन अ‍ॅमेच्योर बॉक्सिंग चम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. २०२० मध्ये तो अमान येथे झालेल्या बॉक्सिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला होता आणि त्याने टोकियोचे तिकीट मिळवले होते.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---