---Advertisement---

एक वर्षानंतर घरी पोहचताच कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने मारली आई-बहिणींना मिठी; पाहा स्वागताचे फोटो

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 9:23 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन मंगळवारी (१७ ऑगस्ट) आसाममधील गोलाघाट गावी पोहोचली. तेथे पोहोचल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोव्हलिना बोर्गोहेनच्या घरी पोहोचल्यावर तिथले वातावरण प्रचंड भावनिक झाले होते. ती घरी पोहोचताच तिने तिच्या आईला मिठी मारली. लोव्हलिनाच्या दोन मोठ्या जुळ्या बहिणी तिच्या स्वागतासाठी घराबाहेर उभ्या होत्या. तिथे पोहोचताच तिन्ही बहिणींनी एकमेकांना मिठी मारली. घराबाहेर उपस्थित लोकांनी तिचे अप्रतिम पद्धतीने स्वागत केले.

गेल्या वर्षी, लोव्हलिनाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यासोबतच तिची आई मामोनी बोर्गोहेन यांचेही गेल्या वर्षी किडनी प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर जवळपास एका वर्षानंतर ती पहिल्यांदा तिच्या आईला भेटली. लोव्हलिना एका दिवसासाठी तिच्या घरी आली आहे आणि बुधवारी वेगवेगळ्या सोहळ्यांना उपस्थित राहण्यासाठी ती निघेल.

लोव्हलिनाचे वडील टिकेन बोर्गोहेन म्हणाले, “ती जवळजवळ एक वर्षानंतर घरी आली आहे. आमच्यासाठी हा खूप खास क्षण आहे. जरी ती खूप कमी काळासाठी आली असली, तरी २५ ऑगस्टनंतर ती काही काळ घरी परत येईल.”

दिमापूर विमानतळावर जोरदार स्वागत
मंगळवारी दुपारी लोव्हलिना बोर्गोहेन दिमापूर विमानतळावर पोहोचली, तेव्हा गोलाघाटचे लोक मोठ्या संख्येने तिचे स्वागत करण्यासाठी तेथे उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे आमदार विश्वजित फुकन, जिल्हा उपायुक्त आणि पोलीस अधीक्षकही उपस्थित होते. दिमापूर विमानतळावरून ५५ किमी अंतरावर तिच्या घरी जाताना, लोक दोन्ही बाजूंनी तिला टाळ्या वाजवताना दिसले.

लोव्हलिना बोर्गोहेन मानले लोकांचे आभार
सर्वप्रथम लोव्हलिना बारपाथार उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित स्वागत कार्यक्रमाला उपस्थित राहिली. आसाम सरकारचे मंत्री अजिंठा नियोग आणि अतुल बोरा यांनी या कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी, लोव्हलिना हिने लोकांच्या या आश्चर्यकारक स्वागताबद्दल आभार मानले आणि सांगितले की, भविष्यात ती आपल्या देश आणि राज्यात नावलौकिक मिळवण्यासाठी अधिक मेहनत घेईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानमधील क्रिकेट स्टेडियम बनले शेत, पिकवला जातोय भोपळा अन् मिरच्या; व्हिडिओ व्हायरल

‘इंग्लंड हा पराभव विसरणार नाही’, लॉर्ड्स कसोटीबाबत माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य

कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स? भारतीय चाहत्यांना खटकू शकतात पाकिस्तानी कर्णधाराचे ‘हे’ बोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---