नुकताच (२६ जुलै) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये बॅडमिंटन खेळातील पुरुषांचा मिश्र गटातील सामना पार पडला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रैंकारेड्डी आणि चिराग शेट्टी व इंडोनेशियाचे बॅडमिंटनपटू मार्कस गिदोन आणि केविन सुकामुल्जो या सामन्यात आमने सामने होते. या चुरशीच्या सामन्यात पुरुषांच्या मिश्र गटातील अव्वल बॅडमिंटनपटूंच्या जोडीने भारताला पराभवाची धूळ चारली आहे.
भारतीय बॅडमिंटनपटूंच्या जोडींपैकी एकाला सामन्यादरम्यान उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरही कोर्टवर आले होते. परंतु त्या बॅडमिंटनपटूने जिद्दीने खेळ पुढे सुरू ठेवला. मात्र अखेर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गिदोन आणि सुकामुल्जोपुढे चिराग आणि सात्विकचा पहिल्या सेटमध्ये १३-२१ ने पराभव झाला. त्यानंतर त्यांनी १२-२१ ने दुसरा सेटही गमावला.
Chin up champs, you did great 👏🏻
MD pair @Shettychirag04 & @satwiksairaj go down 13-21, 12-21 against world no. 1 🇮🇩 pair M Gideon & K Sanjaya at @Tokyo2020 . They will play their next against 🇬🇧's @BenLane012 & @SeanVendy #SmashfortheGlory#badminton#Tokyo2020#TeamIndia pic.twitter.com/o4bmXeqsYH
— BAI Media (@BAI_Media) July 26, 2021
आता भारताची ही बॅडमिनपटूंची जोडी मंगळवारी (२७ जुलै) सकाळी ८.३० वाजता दुहेरी गटातील सामना खेळेल. यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी इंग्लंडचे बॅडमिंटनपटू बेन लेन आणि सिन वेंडी हे असतील.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकमध्ये जागतिक महामारीचा हाहाकार, सापडली कोरोनाची १६ नवी प्रकरणे
भारताला महिला टेबल टेनिसमध्ये अपयश! सुतीर्थ मुखर्जीचा पोर्तुगालच्या फू यूकडून दारुण पराभव