नुकत्याच २०२१ च्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या आहेत. भारताने या स्पर्धेत 7 पदके जिंकली आहेत. कुस्तीपटू रवी दहियाने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यानंतर पदक जिंकलेल्या खेळाडूंवर सर्वत्र बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता दिल्ली सरकारने रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहियाचा सन्मान केला आहे. पण दिल्ली सरकारने त्याचा सन्मान करण्यासाठी अनोखा मार्ग वापरला आहे. त्यांनी रवी दहियाच्या लहानपणीच्या शाळेचे नाव बदलून त्याचे नाव शाळेला दिले आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाने रवी दहियाचा सन्मान करताना म्हटले की, “दिल्लीच्या सरकारी शाळेत शिक्षण घेणारा रवी दहिया, त्याने घेतलेल्या मेहनत आणि लगनमुळे आज देशाचा युथ आयकाॅन बनला आहे.”
रवी दहियाने सांगितले होते की, ऑलिम्पिक मेडल जिंकण्यामागे दिल्ली सरकारचे मोठे सहकार्य राहिले आहे. दिल्ली सरकार त्याची मदत तेव्हापासून करत आहे जेव्हा त्याची ऑलिम्पिकसाठी निवडही झाली नव्हती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे निर्बंध लावले गेले असतानाही दिल्ली सरकारने त्याचा सराव बंद नाही होऊ दिला. दिल्ली सरकारने मिशन एक्सेलंसच्या अंतर्गत त्या काळात रवीला प्रशिक्षक आणि अन्य साधनांची पुर्तता केली होती.
रवी दहियाला सन्मानित करताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, “आमच्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की आमच्या शाळेतून शिक्षण घेतलेला एक मुलगा देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकून आणत आहे. या शाळेत रवीचे एक मोठे पोर्ट्रेटही लावले जाईल. ज्याला पाहून लहान मुले प्ररित होतील, स्वप्न पाहतील आणि खेळाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतील. हे मुलांचे धैर्य वाढवण्याचे कामही करेल.”
पुढे बोलताने ते म्हणाले की, “दिल्ली सरकार दिल्लीमध्ये खेळाला बढावा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. सरकार खेळासाठी वेगळे स्कुल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सिलंस आणि स्पोर्ट्स युनिवर्सीटी सुरू करत आहे. याचे उद्दिष्ट आहे की खेळाडूंचे कौशल्य ओळखून त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे. पुढच्या वर्षी तेथे प्रवेश सुरू होईल.”
मनीष सिसोदियांनी पुढे बोलताना म्हटले की, “देशासाठी मेडल जिंकून आणण्यामध्ये सर्वात मोठी बाधा आहे की, आपल्या शाळांमध्ये खेळण्याला शिक्षण समजले जात नाही. विचार करा, जर रवी दहियाच्या शिक्षकांनी त्याला खेळण्याऐवजी इतिहास किंवा दुसरा विषय शिकण्यावर जोर दिला असता तर रवी दहिया आज इतिहास बनवू शकला नसता. पदक जिंकून येणाऱ्या खेळाडूंवर सर्वच बक्षिसांचा पाऊस पाडतात. पण दिल्ली सरकार खेळाडूंची तेव्हा मदत करत जेव्हा तो खेळाडू प्रयत्न करत असतो. खेळाडूंच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांची मदत करून दिल्ली सरकार त्यांना मेडल जिंकण्यालायक बनवत आहे.”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “दिल्ली सरकारने खेळात चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंच्या मदतीसाठी तीन स्तरांवर योजना सुरू केल्या आहेत. पहिल्या स्तरात १४ वर्षांपर्यंतच्या खेळाडूंसाठी २ लाख, दुसऱ्या स्तरावर १७ वर्षांपर्यंतच्या खेळाडूंसाठी ३ लाख आणि तिसऱ्या स्तरावर १७ वर्षाच्या पुढच्या खेळाडूंना १६ लाखांपर्यंतची सहायता रक्कम दिली जाते.”
महत्त्वाच्या बातम्या-
मोदींनी शब्द पाळला!! नीरज चोप्रासोबत चुरमाचा, तर पीव्ही सिंधूबरोबर घेतला आईस्क्रीमचा आस्वाद
‘भावा, मी चुकलो’; ऑलिंपिक उपांत्य सामन्यात रवी दहियाचा चावा घेणाऱ्या कुस्तीपटूने मागितली माफी
विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाची मागितली माफी, ‘या’ कारणास्तव केले होते निलंबित