जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिंपिकच्या आयोजनातील अडचणी कमी व्हायचे नाव घेईनात. यापूर्वी एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये त्यावेळी प्रेक्षकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जपान सरकारने १२ जुलै ते २२ या काळात टोकियो शहरात आणीबाणी लागू केली आहे. जपानचे मंत्री तमायो मारुकावा यांनी याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच केली.
उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
मागील काही दिवसांपासून जपानमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक परिषदेचे अध्यक्ष थॉमस बाक टोकियो येथे पोहोचले होते. सात दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर त्यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा व आयोजन समिती यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत आगामी ऑलिंपिक ही विनाप्रेक्षक खेळणेविषयी निर्णय झाला. ऑलिंपिकचे आयोजन २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत टोकियो येथे होणार आहे.
जपानमध्ये वाढला कोरोनाचा प्रभाव
मागील दोन दिवसांपासून टोकियो येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले. गुरुवारी ८९६ तर, बुधवारी ९२० कोरोना रुग्ण सापडले होते, यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता. मागील दोन दिवसात सापडलेला रुग्णांची ही संख्या १३ मे नंतर सर्वाधिक आहे. मागील आठवड्यात रुग्णसंख्या ६६३ इतकी होती.
भारताला या वेळी अधिक पदकांची अपेक्षा
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला अधिक पदके मिळण्याची अपेक्षा आहे. मागील २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये भारताने केवळ दोन पदके मिळवली होती. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने रौप्य तर, कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कांस्यपदक जिंकले होते. यावर्षी भारताला भारताचे दोन्ही हॉकी संघ, भालाफेकपटू नीरज चोप्रा, पी व्ही सिंधू, दीपिका कुमारी, अतानु दास याशिवाय नेमबाज व कुस्तीपटूकडून भारताला पदकांची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं तर! आणखी ‘इतके’ वर्षे धोनी खेळणार सीएसकेकडून, सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिली माहिती
‘तुझे शेजारचे आता हाय अलर्टवर असतील’, दिनेश कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिग्गजाने घेतली मजा
मायकल वॉन स्वत:लाच म्हणाला, ‘४६ वर्षांचा मॉडेल’; जडेजाने दिली भन्नाट प्रतिक्रिया