---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स: सोशल मीडियावर व्हायरल होणारी ‘ही’ देखणी मुलगी आहे तरी कोण? वेधलंय सर्वांचं लक्ष

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 3:45 PM
---Advertisement---

जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिंपिक्स २०२० खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळांच्या या महाकुंभ मेळ्यात जिथे काही महिला खेळाडू आपल्या प्रदर्शनामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत, तर दुसरीकडे काही जणी आपल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, काही अशाही असतात, ज्या ऑलिंपिकचा भाग नसूनही नेटकऱ्यांकडून व्हायरल होतात. अशीच एक मुलगी आहे त्झुयू.

त्झुयूचा सोशल मीडियावरील व्हिडिओ चांगलाच हिट होत आहे. तिला टोकियो ऑलिंपिकशी जोडले जात आहे. या व्हिडिओत ती तिरंदाजी स्पर्धेमध्ये भाग घेताना दिसत आहे. तिला कोणी कोरियाची तिरंदाज, तर कोणी चीनची तिरादंज म्हणत आहेत. मात्र, तिचा आणि ऑलिंपिकचा कोणताही संबंध नाही.

https://twitter.com/illicitaegi/status/1421568244742123524

https://twitter.com/CTYFILM/status/1422145931332382720

ब्राझीलच्या एका पत्रकाराने ट्वीट करत सांगितले की, “माझ्या मैत्रिणीला वाटले की, त्झुयू तिरंदाज आहे आणि तिने व्हायरल ट्वीट मला पाठवले. मला सांगावे लागले की, त्झुयू ही एक आयडल आहे. तिने आयडल स्टार ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये (ISAC) भाग घेतला होता.”

त्झुयूच्या तिरंदाजीचा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा तिने ISACमध्ये भाग घेतला होता. तिने नेहमीच आयडल स्टार ऍथलिटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे. तसेच ती नेहमीच आपल्या कौशल्य आणि सौंदर्यामुळे नेहमीच व्हायरल झाली आहे.

त्झुयूचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ २०१९ मधील आहे. ती तैवानची असून एक गायिका आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-अरेरे! भालाफेक खेळात क्लालिफायर्समधील खराब प्रदर्शनामुळे अन्नू राणी ऑलिंपिकमधून बाहेर

-हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत

-दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---