टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटविण्याच्या उद्देशाने भारतीय पथकातील 88 सदस्यांची पहिली तुकडी रविवारी(18 जुलै) सकाळी टोकियोमध्ये पोहचली आहे. या स्पर्धेला 23 जुलैपासून सुरूवात होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे 228 सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे, ज्यात 119 खेळाडूंचा समावेश आहे.
कोरोनाच्या प्रभाव असूनही आयोजित केलेल्या टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताकडून पहिल्या तुकडीत 8 खेळांचे बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, ज्युडो, जिम्नॅस्टिक, जलतरण आणि वेटलिफ्टिंगचे अधिकारी, सहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू हे नवी दिल्लीहून विशेष विमानाने जपानच्या राजधानीत दाखल झाले.
पहिली तुकडी 88 सदस्यांची असून त्यामध्ये 54 खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफ आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी देखील आहेत.
जपानला विमानतळावर पोहतल्यानंतर कुरोबे शहराच्या प्रतिनिधींनी भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. त्यांच्या हातात बॅनर होता, ज्यावर असे लिहिले होते की, ‘कुरोबे भारतीय खेळाडूंना पाठिंबा देत आहे #चीअर्स4इंडिया.’
Touchdown Tokyo ????
Our contingent has safely landed in Tokyo. Here's a peek from their arrival at the airport. #Hockey#Cheer4India @PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @YASMinistry @WeAreTeamIndia @TheHockeyIndia @DDNewslive @ddsportschannel pic.twitter.com/UK8goPPwa5
— SAI Media (@Media_SAI) July 18, 2021
त्याचबरोबर हॉकी खेळामध्ये पुरुष आणि महिला हॉकी संघाचा देखील समावेश आहे. त्यामुळे हॉकी या खेळातील भारताच्या पथकातील सर्वात मोठी तुकडी आहे. त्याच बरोबर शनिवारी रात्री क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर टाळ्या आणि अभिनंदनपूर्ण संदेश देऊन भारतीय पथकाला औपचारिक निरोप दिला होता.
याचदरम्यान विमानतळावर एक अनपेक्षित दृश्य दिसले. ऑलिम्पिकच्या तुकडीसाठी रेड कार्पेट घातला होता. खेळाडू टोकियोला रवाना होत असताना इतका उत्साह होता की भारत सरकारने या सदस्यांच्या कागदापत्रांची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती.
Touchdown Tokyo????
Our Archery contingent is welcomed with smiles & warmth by the people of Kurobe, host town.
We thank them for their support & hospitality shown to our athletesShare your best wishes with #Cheer4India
@ImDeepikaK @ArcherAtanu @tarundeepraii @pravinarcher pic.twitter.com/Pdqo661mVa— SAI Media (@Media_SAI) July 18, 2021
अनुराग ठाकूर यांच्या व्यतिरिक्त औपचारिक निरोप देण्यासाठी क्रीडा राज्यमंत्री निश्चित प्रमाणिक भारताचे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे महासंचालक संदीप प्रधान, आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता हे सर्व उपस्थित होते.
Here we go @WeAreTeamIndia ! ????????
• Send off given to the 88 member strong Indian Olympics contingent. #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/1NtNZNr5In
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) July 17, 2021
काही भारतीय खेळाडू विदेशात सराव करण्यासाठी असल्याने ते तेथूनच टोकियोमध्ये उपस्थित होणार आहेत. अमेरिकेतील सेंट लुईस येथील प्रशिक्षण मैदानातून भारताची एकमेव वेटलिफ्टर मीराबाई चानू शुक्रवारी(16 जुलै) टोकियो येथे दाखल झाली आहे. त्याचबरोबर इटली आणि क्रोएशियामधून सराव करुन बॉक्सर आणि नेमबाज येथे दाखल झाले आहेत.
भारतातील पहिले चार भारतीय नाविक हे नेत्र कुमानन आणि विष्णू सरवानन (लेझर क्लास), के.सी. गणपती आणि वरुण ठक्कर (४९ ईआर क्लास) युरोपमधील प्रशिक्षण घेत असलेल्या ठिकाणाहून टोकियोला पोहोचले आहे. त्याने गुरुवारी सराव देखील सुरू केला आहे. याशिवाय रोइंग टीम देखील टोकियो येथे पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत खेळतोय आपल्या त्रिमूर्तीविना; तब्बल सहा वर्षानंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडलीये ‘ही’ गोष्ट
संजू सॅमसनच्या पदार्पणाची चर्चा असूनही इशान किशनला का मिळाली संधी? कारण आले पुढे






