---Advertisement---

अवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 8:57 PM
---Advertisement---

भारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले असून पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला नेमबाज आहे. तिने 249.6 विश्वविक्रमी गुण नोंदवून हे पदक जिंकले. तिच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर तिला क्रिकेट विश्वासोबतच इतर खेळांशी संबंधित दिग्गजांनीही अभिनंदन केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सुवर्णपदक जिंकल्यानंतर अवनीचे अभिनंदन केले. त्याने ट्वीट करून म्हटले आहे, “अवनी लेखराने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा ऐतिहासिक करिष्मा केला आहे, भारतीय खेळातील हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे.” याशिवाय लक्ष्मणने योगेश कठुनियाला रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदनही केले.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने अवनीचे अभिनंदन करताना ट्वीट करत म्हटले आहे, “तू इतिहास रचला आहे, पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्ण जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू, वाह अवनी, उत्कृष्ट कामगिरी”

ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रानेही 19 वर्षीय अवनी लेखराचे अभिनंदन करत म्हटले आहे, अवनी लेखाराची नेमबाजीत चमकदार कामगिरी भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी, खूप अभिमान आहे, तुमच्या ऐतिहासिक शॉटसाठी अनेक अभिनंदन.

अवनीच्या सुवर्ण कामगिरीवर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही ट्वीट करून लिहिले, “अभूतपूर्व, अवनीही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.” ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला बनली आहे, तिने 10 मीटर एअर रायफल स्पर्धा स्टँडिंग एसएच -1 पॅरालिम्पिकमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

माजी क्रीडा मंत्री आणि सध्याचे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट केले, “भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले, पॅरानेमबाजीमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे मनःपूर्वक अभिनंदन, आम्हाला तुझा अभिमान आहे अवनी.

अवनी भारताची पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिला महिला खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

एकही दिल कितनी बार जितोगे! ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट

टोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने ‘कांस्यपदका’ला घातली गवसणी

पाहावं ते नवलंच! सीपीएलच्या लाईव्ह सामन्यावेळी कोंबड्याच्या ऐटदार चालीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---