इंग्लंडच्या टॉम कोहलर कॅडमोरनं राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याचा राजस्थानचा स्टार सलामीवीर जोस बटलरच्या जागी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र आपल्या पहिल्या सामन्यात कॅडमोर काही विशेष कमाल करू शकला नाही. तो 23 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.
टॉम कोहलर कॅडमोर या सामन्यात तो चर्चेत राहिला तो त्याच्या खास नेक बँड मुळे. खरं तर, हा गळ्याचा बँड नसून क्यू कॉलर आहे, जी कॅडमोर प्रत्येक सामन्यात घालतो. पंजाबविरुद्ध तो फलंदाजीला उतरला तेव्हा समालोचकांच्या ते सर्वात आधी लक्षात आलं. यानंतर ही कॉलर काय आहे आणि त्याची खासियत काय आहे यावर चर्चा सुरू झाली.
क्यू कॉलर ही क्रिकेटमध्ये नवीन संकल्पना आहे. ही कॉलर सामान्यतः NFL आणि फुटबॉल खेळाडू परिधान करतात. याशिवाय फिफा महिला विश्वचषकादरम्यानही ती व्हायरल झाली होती. ही क्यू कॉलर खेळाडूंच्या डोक्याला चेंडू लागल्यास त्यांचं संरक्षण करते. खेळादरम्यान खेळाडू पडल्यास किंवा चेंडूनं आदळल्यास ही कॉलर बँड धक्का शोषून घेते. ही मेंदूला कोणत्याही प्रकारचा शॉक किंवा आघात झाल्यास खेळाडूचं संरक्षण करते.
टॉम कोहलर हा क्यू बँड का वापरतो यामागे एक मनोरंजक कथा आहे. वास्तविक, 2022 मध्ये, कोहलर पोस्ट-कन्कशन सिंड्रोमनं ग्रस्त होता. तेव्हापासून त्यानं ही क्यू कॉलर वापरण्यास सुरुवात केली. हंड्रेड स्पर्धेदरम्यान कोहलरचे क्यू कॉलर घातलेले फोटोही व्हायरल झाले होते. कोहलर हा इंग्लिश यष्टिरक्षक फलंदाज आहे जो सॉमरसेटकडून खेळतो. तो जगभरातील टी20 लीगमध्ये खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नेपाळचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेला कोर्टाकडून क्लीन चिट, बलात्काराचा होता आरोप
जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय
गुवाहाटीच्या मैदानावर रंगणार राजस्थान विरुद्ध पंजाब सामना, संजू सॅमसनचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय