आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. मात्र लोकसभा निवडणुकांचा कालावधी असल्याने तारखांबाबत घोळ होता. स्पर्धेचं आयोजन कसं आणि कधी करावं याबाबत खलबतं सुरु होती. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पाच दिवसानंतर आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याआधी अनुभवी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी एक वक्तव्य केलं आहे.
अनुभवी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी गुरुवारी म्हंटले आहे की आयपीएल आणि आयएलटी-20 सारख्या स्पर्धात्मक लीगमधील खेळाडूंची कामगिरी यावेळी खूप महत्त्वाची ठरेल कारण त्याचा परिणाम टी-20 विश्वचषकापूर्वी संघ निवडीवर होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) T-20 विश्वचषक स्पर्धेचा हा टप्पा जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे.
याबरोबरच, ‘ILT20’ च्या डेझर्ट वायपर्स संघाने आयोजित केलेल्या आभासी संवादा दरम्यान मूडी म्हणाले आहेत की, इंडियन प्रीमियर लीग (IPL) मार्च ते मे दरम्यान खेळवली जाणार आहे. तसेच, 58 वर्षीय मूडी म्हणाले की, ‘जर तुम्ही धावा करत असाल, विकेट घेत असाल आणि सातत्य दाखवत असाल तर ते तुम्हाला चांगल्या स्थितीत ठेवते कारण ते तुमच्या निवडीसाठी मदत करते.
तसेच पुढे बोलताना टॉम मूडी म्हणाले आहेत की, ‘असे अनेक खेळाडू आहेत जे यापूर्वी वेस्ट इंडिजमध्ये खेळले आहेत आणि अमेरिकेत त्यांच्यासाठी अनेक गोष्टी नवीन असणार आहेत. जागतिक दर्जाच्या खेळाडूंबद्दल सांगायचे तर, त्यांना या परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची सवय आहे आणि मला पूर्ण आशा आहे की ते या खेळपट्ट्या लवकरच समजून घेतील आणि चांगली कामगिरी करतील. मग ते 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग असो किंवा लहान धावांचा असो.
दरम्यान, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मूडी 2013 ते 2019 पर्यंत सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक होते. यादरम्यान संघ 5 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला तर एकदा चॅम्पियनही झाला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हल बेलिसला 2020 मध्ये सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. मात्र वर्षभरानंतर टॉम मूडीला पुन्हा सनराइजमध्ये ही जबाबदारी देण्यात आली. पण त्याचा दुसरा टप्पा चांगला राहिला नाही.
महत्वाच्या बातम्या –
U19 World Cup 2024 । ‘नाव इतिहिसात कोरायचं आहे…’ वर्ल्डकप फायनलआधी भारतीय कर्णधार जोमात
WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स किती मजबूत? पहा हरमनप्रीतच्या संघाची जमेची बाजू