अवघ्या क्रिकेट जगताला डकवर्थ-लुईस हा नियम देणाऱ्या जोडीमधील महान सांख्यिकीतज्ञ टोनी लुईस यांचे रविवारी (१ एप्रिल) निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. डकवर्थ-लुईस या नियमाचे नाव नंतर डकवर्थ-लुईस-स्टर्न असे करण्यात आले.
टोनी लुईस आणि सांख्यिकीतज्ञ फ्रँक डकवर्थ (Frank Duckworth) या दोघांनी एकत्र येऊन हा नियम तयार केला होता. या नियमाचा वापर करून हवामानामुळे परिणाम झालेल्या सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी तर्कसंगत समीकरण मांडले जाऊ शकते.
डकवर्थ आणि लुईस यांच्या जोडीने १९९७मध्ये हा नियम आयसीसीला (ICC) सादर केला. यानंतर १९९९मध्ये इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या विश्वचषकापासून हा नियम वापरात आणला गेला.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England And Wales Cricket Board) बुधवारी (१ एप्रिल) सांगितले की, “टोनी लुईस (Tony Lewis) यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर ईसीबीला खूप दु:ख झाले. ते ७८ वर्षांचे होते.”
“टोनीने आपले सहकारी फ्रँक डकवर्थसोबत मिळून १९७७मध्ये डकवर्थ-लुईस हा नियम तयार केला होता. यानंतर आयसीसीने १९९९ मध्ये या नियमाला संमती दिली होती,” असेही ईबीसीने यावेळी सांगितले.
या नियमामुळे आयसीसीला अनेक वेळा टीकेचा सामना करावा लागतो. या नियमाला २०१४ पासून डकवर्थ-लुईस-स्टर्न (Duckworth-Lewis-Stern) असे संबोधण्यात येऊ लागले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे सांख्यिकीतज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी सध्याच्या स्कोरिंग-रेटच्या हिशोबाने बदल केला.
“या नियमाचे नाव २०१४ मध्ये बदलले तरीही जगभरात आजही त्याला डकवर्थ लुईस नियम असेच संबोधले जाते. टोनी आणि फ्रँक यांच्या योगदानाबद्दल क्रिकेट त्यांचा नेहमीच ऋणी राहिल. आम्ही टोनीच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो,” असेही ईबीसी यावेळी म्हणाले.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) यांच्यात १९९२ साली झालेल्या प्रसिद्ध उपांत्य सामन्यानंतर गणिताचा हा नियम लागू करण्यावर विचार करण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी १३ चेंडूत २२ धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिका संघ त्यावेळी आश्चर्यचकीत झाला होता. कारण थोड्या वेळ झालेल्या पावसानंतर बदललेले समीकरण हे १ चेंडूत २२ धावा असे झाले होते.
२०११ विश्वचषक विशेष-
–धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
–२०११ विश्वचषक विजयातील केवळ एक हिरो आहे सध्याच्या टीम इंडियाचा सदस्य
–तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
–आठवण – भारताच्या विश्वविजयाची
–गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
–का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?