सध्या इंटरनेटवर सगळीकडे 2024 गुगल सर्च लिस्टची चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगट यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेलेली भारतीय ठरली. आता अशा 10 कीवर्डची लिस्ट समोर आली आहे, ज्यांना भारतीयांनी यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलं. या लिस्टमध्ये भारतीय जनता पार्टी अर्थातच भाजपा, 2024 लोकसभा निवडणूक निकाल आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 यांचा समावेश आहे. मात्र पहिलं दोन स्थान खेळाशी संबंधित विषयांनी पटकावलंय!
या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर 2024 टी20 विश्वचषक आहे. भारतानं यावर्षी झालेल्या टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. पहिल्या क्रमांकावर इंडियन प्रीमयर लीग अर्थातच आयपीएल 2024 आहे. शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं यावर्षी आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं. नुकत्याच झालेल्या मेगा लिलावादरम्यान आयपीएल पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. मेगा लिलावात रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना अनुक्रमे 27 कोटी आणि 26.75 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी करण्यात आलं.
भारतीयांनी यावर्षी खेळांमध्ये खूपच रुची दाखवली. टॉप 10 लिस्टमध्ये 5 विषय खेळांशी संबंधित आहेत. पहिल्या क्रमांकावर आयपीएल, दुसऱ्या क्रमांकावर टी20 विश्वचषक, पाचव्या क्रमांकावर पॅरिस ऑलिम्पिक, नवव्या क्रमांकावर प्रो कबड्डी लीग आणि दहाव्या क्रमांकावर इंडियन सुपर लीग (फुटबॉल) आहे.
गुगलची भारतातील टॉप-10 कीवर्ड सर्च लिस्ट (2024)
इंडियन प्रीमियर लीग (IPL)
टी20 विश्वचषक
भारतीय जनता पार्टी
लोकसभा निवडणूक 2024 निकाल
ऑलिम्पिक 2024
भीषण गर्मी
रतन टाटा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
प्रो कबड्डी लीग
इंडियन सुपर लीग
हेही वाचा –
मोहम्मद रिझवानचा रेकॉर्ड, टी20 क्रिकेटमध्ये दोनदा केला हा लाजिरवाणा विक्रम
मॅच न खेळता भारताने केला विश्वविक्रम, सामनाच्या 200 दिवस आधीच सर्व तिकिटांची विक्री!
IND vs AUS: टीम इंडियाची चिंता वाढली, सरावादरम्यान स्टार खेळाडू जखमी!