पुणे (24 मार्च 2024)- आज प्रमोशन फेरीतील प्रत्येक संघाचे सहा सामने पूर्ण झाले. अहमदनगर व कोल्हापूर संघाने प्रमोशन फेरीतील सलग सहा सामने जिंकत टॉप 2 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तर मुंबई शहर व बीड बॉटम 2 संघामध्ये राहणार हे सुनिश्चित आहे. उर्वरित चार संघ तिसऱ्या ते सहाव्या स्थानावर राहणार आहेत.
आज झालेल्या पहिल्या लढतीत नंदुरबार संघाने 41-30 असा मुंबई शहर संघावर विजय मिळवला. नंदुरबारच्या अष्टपैलू खेळ करत एकूण 14 गुण मिळवले. जयेश महाजन ने चढाईत 11 गुण मिळवले. तर तेजस राऊत ने हाय फाय पूर्ण करत अष्टपैलू खेळ केला. मुंबई शहर कडून राज आचार्य ने सर्वाधिक 13 गुण मिळवले. आजच्या दुसऱ्या सामन्यात अहमदनगर संघाने 50-21 अशी पालघर संघावर मात देत प्रमोशन फेरीतील सहावा विजय मिळवला. अहमदनगर कडून प्रफुल झावरे व आशिष यादव यांनी चढाईत प्रत्येकी 14 गुण मिळवले.
कोल्हापूर संघाने बीड संघाचा 61-25 असा धुव्वा उडवत प्रमोशन फेरीतील सहावा विजय मिळवला. ओमकार पाटील ने चढाईत 15 गुण मिळवले. सौरभ फगारे ने चढाईत 11 व चंद्रकांत जगताप ने 8 गुण मिळवले. तर वैभव राबाडे ने पकडीत एकूण 6 तर साईप्रसाद पाटील ने 4 गुण मिळवले. आजच्या शेवटच्या सामन्यात सांगली ने 43-33 असा रत्नागिरी संघावर विजय मिळवत गूणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. सांगली कडून अभिराज पवार ने चढाईत 14 गुण मिळवले. तर शुभम पाटील ने हाय फाय पूर्ण करत अष्टपैलू खेळ केला. (Top 2 and Bottom 2 Teams in Promotion Round in Yuva Kabaddi Series Determined)
प्रमोशन फेरी गुणतालिका.
1. अहमदनगर – 36 गुण (6 सामने)
2. कोल्हापूर – 33 गुण (6 सामने)
3. नंदुरबार – 19 गुण (6 सामने)
4. पालघर – 19 गुण (6 सामने)
5. सांगली – 17 गुण (6 सामने)
6. रत्नागिरी – 13 गुण (6 सामने)
7. मुंबई शहर – 6 गुण (6 सामने)
8. बीड – 1 गुण (6 सामने)
महत्वाच्या बातम्या –
अखेरच्या 15 मिनिटांत कोल्हापूर संघाने बीड संघाचा धुव्वा उडवला
रत्नागिरी संघावर मात देत सांगली संघ पाचव्या स्थानावर