इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर फलंदाज फ्लॉप ठरले होते. त्यानंतर भारतीय फलंदाज विराट कोहलीने चांगली फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. यासह तो सर्वात जलद २३ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करणे सोपी गोष्ट मुळीच नव्हे, कारण असा कारनामा करण्यासाठी तुम्हाला सतत चांगली कामगिरी करावी लागते. दरम्यान असे ७ फलंदाज आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. परंतु, हा टप्पा सर्वात कमी सामन्यात पूर्ण करण्याचा विक्रम दोन भारतीयांच्या नावावर आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३ हजार धावा करणारे फलंदाज.
३) रिकी पाँटिंग :
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा एक अप्रतिम कर्णधार होता. यासह तो एक उत्तम फलंदाज देखील होता. त्याने जगभरातील दिग्गज गोलंदाजांविरुद्ध खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. तसेच रिकी पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा करण्याचा पराक्रम ५४४ डावांमध्ये केला होता. त्याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ६६८ डावात २७,४८३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ७१ शतक आणि १४६ अर्धशतक झळकावले होते. सर्वात जलद २३ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२) सचिन तेंडुलकर :
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक मोठ-मोठे पराक्रम केले आहेत. त्याच्या नावे १०० शतकं करण्याचा विक्रम आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम ५२२ डावांमध्ये केला होता. सचिन तेंडुलकर असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज होता. परंतु, विराट कोहलीने हा विक्रम मोडून काढला.
१) विराट कोहली:
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. दरम्यान, त्याने आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहलीने २३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. दरम्यान सर्वात जलद २३ हजार करणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने ४९० डावांमध्ये हा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात ‘युनिवर्स बॉस’ गेलच्या वेगवान शकताचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेले ६ फलंदाज
आकरा खेळाडू मिळूनही करु शकले शेवटच्या फलंदाजाला बाद, सामना राहिला अनिर्णीत; पाहा व्हिडिओ
ओमानने मुंबईविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत सामना जिंकला, अशी आहे मालिकेतील स्थिती