प्रत्येक क्रिकेटपटूची अशी इच्छा असते की, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे. तसेच आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी. अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होते. तर अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहून जाते. तसेच आपल्या मायदेशात कसोटी क्रिकेट खेळणे हे अनेकदा फायदेशीर ठरते, कारण मायदेशात क्रिकेट खेळल्याने खेळाडूला तेथील परिस्थितीची ओळख असते.
चला तर जाणून घेऊया असे तीन खेळाडू ज्यांनी मायदेशात ९० पेक्षा अधिक कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
३)रिकी पाँटिंग
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पँटिंगने हा त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याला मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये ९० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने मायदेशात ऑस्ट्रेलिया संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. रिकी पाँटिंग बद्दल बोलायचं झालं तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने फलंदाजी आणि संघाचे नेतृत्व या दोन्ही गोष्टींमध्ये आपला ठसा उमटवला.
रिकी पाँटिंगमध्ये मायदेशात ऑस्ट्रेलिया संघासाठी एकूण ९२ कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने ५६.९७ च्या सरासरीने ७५७८ धावा केल्या. यासह २३ शतक आणि ३८ अर्धशतक देखील झळकावले.
२)सचिन तेंडुलकर
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा मान सचिन तेंडुलकरने मिळवला. त्याने आतापर्यंत २०० कसोटी सामने खेळले आहेत. परंतु, मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांपैकी भारतात एकूण ९४ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ५२.६७ च्या सरासरीने ७२१६ धावा केल्या आहेत. यासह मायदेशात त्याने २२ शतक आणि ३२ अर्धशतक देखील झळकावले आहेत. (Top 3 players who played most test matches at home)
१) जेम्स अँडरसन
मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सर्वोच्च स्थानी आहे. जेम्स अँडरसनने आतापर्यंत इंग्लंड संघासाठी मायदेशात एकूण ९५ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे. चौथा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी जेम्स अँडरसनच्या नावे मायदेशातील ९४ कसोटी सामन्यात ४०० बळी होते.
महत्त्वाच्या बातम्या –
रनमशीन कोहलीसाठी ‘या’ गोलंदाजांची फिरकी ठरतेय डोकेदुखी, सर्वाधिकवेळा झालाय बाद
बाप ‘बाप’ असतो! तब्बल १० महिन्यांनी वसीम अक्रम भेटला आपल्या मुलीला, इमोशनल व्हिडिओ केला शेअर