इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात अनेक अनपेक्षित विक्रम निर्माण झाले. गुजरात टायटन्स संघाने यंदाच्या वर्षी आयपीएलचा किताब जिंकत पहिल्याच हंगामात आयपीएल विजेते होण्याच्या विक्रमात राजस्थाच्या संघाची बरोबरी केली आहे. तर, राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षानंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यांत पोहोचला होता. या वर्षी राजस्थाच्या संघाने अविश्वसनीय प्रदर्शन केले आहे. ज्याचे हकदार हे तीन फलंदाज आहेत, ज्यांनी संपूर्ण हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
१. देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal)
देवदत्त पडिक्कलने या आयपीएल हंगामातील १७ सामन्यांमध्ये २२.१२च्या सरासरीने आणि १२२.८७च्या स्ट्राइक रेटने ३७६ धावा केल्या. यादरम्यान, त्याने फक्त एकदाच ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ५४ धावा होती. या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ३ फलंदाजांच्या यादीत देवदत्त तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२. संजू सॅमसन (Sanju Samson)
या यादीत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. संजूने राजस्थान रॉयल्ससाठी १७ सामन्यांच्या १७ डावांमध्ये २८.६३च्या सरासरीने आणि १४६.७९च्या स्ट्राइक रेटने ४५८ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन वेळेस अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसनची या मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या ५५ होती.
३. जोस बटलर (Jos Buttler)
राजस्थान रॉयल्ससाठी या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचे नाव जोस बटलर. बटलरने या हंगामात १७ सामन्यांच्या १७ डावांमध्ये १४९.०५च्या स्ट्राइक रेटने आणि ५७.५३च्या सरासरीने ८६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने चार अर्धशतके आणि चार शतके झळकावली. या आयपीएल मोसमात बटलरची सर्वोत्तम धावसंख्या ११६ होती. बटलर हा आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी राजस्थानकडून खेळत असताना फिरकीपटू युझवेंद्र चहल याने सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप आपल्या नावे केली आहे. त्यामुळे एकाच संघातील खेळाडूला ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकण्याचा मान मिळवण्याच्या यादीत आता राजस्थान संघाचा समावेश झाला आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबईच्या खराब कामगिरीवर हळहळला पोलार्ड, भावूक पोस्ट लिहीत म्हणाला, ‘नुकसानीचा अंदाज लावणे कठीण’
पाच खेळाडूंच्या जीवावर गुजरात टायटन्स झाली IPL 2022 विजयाची शिल्पकार, पाहा कोण आहेत ते?
IPL 2023मध्ये ‘हे’ ३ बदल करत सीएसके करणार दमदार पुनरागमन, दुसरा बदल खूपच महत्त्वाचा