कसोटी क्रिकेमध्ये डावात ३०० धावा या तशा अवघड समजल्या जातात. वनडेत डावात २०० धावा करणे तर त्याहुन कठीण. टी२० किंवा ट्वेंटी-ट्वेटीं क्रिकेटमध्ये १०० धावा डावात करणेही कठीण समजले जाते.
कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत ३० वेळा खेळाडूंनी डावात ३०० किंवा अधिक धावा केल्या आहेत. वनडेत ८वेळा खेळाडूंनी २०० धावांचा टप्पा पार केला आहे. यात एकट्या रोहितने ३वेळा हा कारनामा केला आहे. तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५३ खेळाडूंनी शतकी खेळी केली आहे. कसोटीत केवळ ब्रायन लाराला ४०० धावांचा टप्पा पार करता आला आहे.
याचप्रमाणे लीग टी२० सामने व आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट मिळून अनेक खेळाडूंनी शतके केली आहेत. यात सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने बेंगलोरकडून खेळताना पुण्याविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती. त्याने या धावा केवळ ६६ चेंडूत केल्या होत्या. यात १७ षटकार व १३ चौकारांचा समावेश होता. या सामन्यात गेल नाबाद राहिला होता.
तर आंतरराष्ट्रीय टी२० सामम्यात एराॅन फिंचने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिंबाब्वे सामन्यात ७६ चेंडूत १७२ धावांची तुफानी खेळी केली होती. यात १० षटकार व १६ चौकारांचा समावेश होता. Top 4 batsman who could hit a 200 in T20 cricket.
या लेखात टी२०मध्ये द्विशतकी खेळी करु शकणाऱ्या फलंदाजांची माहिती घेऊयात.
4. काॅलिन मुन्रो
न्यूझीलंड संघाचा हा डावखुरा सलामीवीर जगातील एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १५०० किंवा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केलेले ग्लेन मॅक्सवेल, मुन्रो व एराॅन फिंच हे तीनच फलंदाज आहेत. यावरुनच मुन्रोच्या फटकेबाजीचा अंदाज येतो. त्याने ६५ टी२० सामन्यात १५६.४४च्या सरासरीने १७२४ धावा केल्या आहेत. ज्यात ३ शतकांचा समावेश आहे.
३. ख्रिस गेल
टी२० सामन्यांचा किंग अशीच ओळख असलेला गेल हा जगातील केवळ दुसरा खेळाडू आहे ज्याने टी२०मध्ये ४०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. २००५ ते २०२० या काळात गेलने लीग व आंतरराष्ट्रीय टी२० सामने मिळून एकूण ४०४ सामने खेळले आहेत. यात तब्बल २२ शतकं व ८२ अर्धशतकं त्याने केली आहे. १७५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळाडूंने ४०४ सामन्यात १४६.९६चा जबरदस्त स्ट्राईक रेट राखला आहे. यामुळे त्यालाही या प्रकारात द्विशतक करण्याची मोठी संधी आहे.
२. मार्टिन गप्टिल
न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील हा जगातिल स्फोटक फलंदाजांपैकी एक समजला जातो. त्याने वनडेत २३७ धावांची नाबाद खेळी केली आहे तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १०५ धावांची तसेच लीग टी२०मध्ये नाबाद १२० धावांची खेळी केली आहे. सलामीला खेळणाऱ्या या ३३ वर्षीय खेळाडूला हा विक्रम करण्याची मोठी संधी आहे. गप्टीलने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २ शतके केली आहेत.
१. रोहित शर्मा
रोहित हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज समजला जातो. रोहितने वनडे व टी२० क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. रोहित एकदा सेट झाला की तो केवळ फटकेबाजीच करतो. विशेष म्हणजे त्याची फटकेबाजी ही प्रचंड बिनचुक असते. या खेळाडूला याचमुळे टी२० क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी कऱण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे लीग किंवा आंतरराष्ट्रीय टी२० सामने, यात रोहित कुठेही हे द्विशतक करु शकतो.
रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वाधिक ११८ धावा केल्या आहेत. २२ सप्टेंबर २०१७ला श्रीलंकेविरुद्ध खेळताना या ११८ धावांसाठी त्याने ४३ चेंडू खेळले होते. तो जेव्हा बाद झाला तेव्हा सामन्यातील केवळ १२.४ षटकं झाली होती. नाहीतर याच सामन्यात त्याला ही संधी होती. रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४ शतके केली आहेत.
आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-
–२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच
–टाॅप ५- वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी कर्णधार झालेले खेळाडू
–सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार