येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. टी२० क्रिकेटमधील ही जगातील सगळ्यांत लोकप्रिय लीग मानली जाते. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील या लीगचे विजेतेपद पटकावण्यासाठी या लीग मधील आठही संघ कसोशीने प्रयत्न करतील.
मात्र हे विजेतेपद पटकावण्यासाठी त्यांच्याकडे मजबूत फलंदाजी फळीसह तगडे गोलंदाज देखील असणे आवश्यक आहे. विशेषतः पॉवरप्लेमध्ये किफायती गोलंदाजी करणारे गोलंदाजाच संघासाठी आवश्यक असतात, हे टी२० क्रिकेटच्या इतिहासात सिद्ध झाले आहे. त्यामुळे अशा गोलंदाजांकडे यंदाच्या आयपीएल मध्ये सगळ्यांचे लक्ष असेल.
याच निमित्ताने आजच्या लेखात आपण आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये किफायतशीर इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करणार्या अव्वल पाच खेळाडूंचा आढावा घेऊया.
१) जोफ्रा आर्चर –
आयपीएल इतिहासात किमान ५० षटके टाकणार्या गोलंदाजांचा निकष लावला तर पॉवरप्लेत सर्वाधिक किफायतशीर गोलंदाज हा राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चर हा आहे. आर्चरचा पॉवरप्लेमधील इकॉनॉमी रेट केवळ ५.४ प्रति षटक इतकाच आहे. आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये ६ पेक्षा कमी इकॉनॉमी रेट असलेला आर्चर एकमेव गोलंदाज आहे.
२) भुवनेश्वर कुमार –
सनरायझर्स हैद्राबाद संघाचा भुवनेश्वर कुमार हा यादीत दुसर्या स्थानावर आहे. तसेच या यादीत अव्वल पाच क्रमांकातील तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या भुवनेश्वरचा पॉवरप्लेमधील इकॉनॉमी रेट अवघा ६ धावा प्रति षटक असा आहे.
३) सुनील नरिन –
फिरकीपटू असून देखील कोलकता नाईट रायडर्सच्या सुनील नरिनने या यादीत स्थान मिळवले आहे. कारण कोलकताच्या संघाने त्याच्या गोलंदाजीतील वैविध्यामुळे त्याला अनेकदा पॉवरप्लेत गोलंदाजी दिली आहे. त्याचा पॉवरप्लेमधील इकॉनॉमी रेट ६.३ धावा प्रति षटक असा आहे.
४) लसिथ मलिंगा –
या यादीत चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगा आहे. डेथ ओव्हर्समध्ये घातक गोलंदाजी करणारा मलिंगा पॉवरप्लेमध्ये देखील किफायतशीर गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. त्यामुळे त्याचा पॉवरप्लेमधील इकॉनॉमी रेट ६.३ असा आहे.
५) डेल स्टेन –
विश्वातील अव्वल गोलंदाज म्हणवला जाणारा डेल स्टेन या यादीत नसेल, असं होणे शक्यच नाही. तो देखील या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. गती आणि स्विंग असे घातक कॉम्बिनेशन असणार्या स्टेनचा पॉवरप्लेतील इकॉनॉमी रेट ६.३ धावा प्रति षटक असा आहे.
महत्वाच्या बातम्या:
अशा २ व्यक्ती, ज्यांनी खेळाडू व प्रशिक्षक म्हणून जिंकला आहे क्रिकेट विश्वचषक
धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
कोण घेणार आयपीएलमधून माघार घेतलेल्या हेजलवुडची जागा? सीएसकेच्या अधिकाऱ्याने दिले उत्तर