संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रही ठप्प पडले आहेत. अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल म्हणजे आयसीसी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग करत क्रिकेट चाहत्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आयसीसीने त्यांंच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून २००१ ते २०१० दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजी यादी जाहीर केली आहे.
२१व्या शतकाच्या पहिल्या दशकात म्हणजे १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०१० दरम्यान ज्या फलंदाजांच्या फळीने अफलातून कामगिरी करत सर्वाधिक धावा केल्या. अशा फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश आहे. पण, सचिन या यादीत पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर नाही तर ५व्या क्रमांकावर आहे.
मग नक्की असे कोणते क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी या १० वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रनमशीन सचिनलाही मागे टाकले आहे. तर जाणून घेऊयात.. Top 5 cricketer score between 2001 to 2010.
१. रिकी पाँटिंग (Ricky Ponting) :
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा २१व्या शतकाच्या पहिल्या दशकात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने एकूण ३७८ सामने खेळत ४८.५६च्या सरासरीने १९७१८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५५ शतकांचा आणि १०६ अर्धशतकांचा समावेश होता.
२. कुमार संगाकारा (Kumar Sangakara) :
श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगाकारा २००१ ते २०१० दरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३८४ सामन्यात ४४.१०च्या सरासरीने ३४ शतके आणि ९५ अर्धशतके मारत १७०६९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक २८७ धावांचा समावेश होता.
३. जॅक कॅलिस (Jacques Kallis) :
दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस हा त्याच्या काळात संघातील यशस्वी क्रिकेटपटू होता. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत त्याचा तिसरा क्रमांक आहे. त्याने २००१ ते २०१०मध्ये ३०८ सामन्यात १६७१२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ४३ शतकांचा आणि ९८ अर्धशतकांचा समावेश होता. यावेळी त्याची फलंदाजी सरासरी ५४.०८ इतकी होती.
४. माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) :
श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत सचिनला मागे टाकले आहे. त्याने २१व्या शतकाच्या पहिल्या १० वर्षांत एकूण ३९२ सामने खेळले होते. यावेळी ४१.५०च्या सरासरीने त्याने ३४ शतकांच्या आणि ८३ अर्धशतकांच्या मदतीने १६२६९ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
गरीबीमुळे एकवेळ फक्त मॅगी हेच अन्न होते, आज आहे मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू
एक खाणकामगाराचा मुलगा ते भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज
एकाच वनडेत शतक करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ३ भारतीय खेळाडू