क्रिकेट म्हटलं की क्रिकेटपटूंनी केलेल्या मोठ-मोठ्या विक्रमांची नेहमीच चर्चा होत असते. कोणता खेळाडू किती सामने खेळला आहे, किती सामने जिंकला आहे हे नेहमीच पाहिले जाते. पण या लेखात वनडेमध्ये सर्वाधिक पराभव स्विकारणाऱ्या क्रिकेटपटूंचा आढावा घेणार आहोत.
वनडेमध्ये सर्वाधिक पराभव स्विकारणारे 5 क्रिकेटपटू –
1. सचिन तेंडूलकर – 200 पराभव
क्रिकेटमधील परिपूर्ण खेळाडू म्हणून ज्याचा आदर्श घेतला जातो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर वनडेमध्ये सर्वाधिक सामन्यात पराभव पहाणारा खेळाडू देखील आहे. त्याने वनडेमध्ये 463 सामने एकूण खेळले आहेत. त्यातील 200 सामन्यात तो पराभूत संघाचा भाग होता.
त्याने पराभूत झालेल्या 200 सामन्यांमध्ये 6585 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 14 शतकांचा आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.
2. सनथ जयसुर्या – 193 पराभव
श्रीलंकेचा परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू म्हणून सनथ जयसूर्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरवात एक गोलंदाज म्हणून केली. पण काही दिवसातच त्याच्यातील फलंदाजी कौशल्यही सर्वांना पहायला मिळाले.
त्याने त्याच्या कारकिर्दीत 445 वनडे सामने खेळले पण त्यातील 193 सामन्यात त्याने पराभवाचा सामना केला आहे. त्याने पराभूत झालेल्या सामन्यात 3 शतके आणि 20 अर्धशतकांसह 4044 धावा केल्या आहेत. तसेच 97 विकेट्स घेतल्या आहेत.
3. माहेला जयवर्धने – 186 पराभव
श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार माहेला जयवर्धने त्याच्या वैविध्यपूर्ण फलंदाजीने त्याची अनोखी ओळख निर्माण केली. त्याने त्याच्या कारकिर्दीत 448 वनडे सामने खेळले आहेत.
20 व्या वर्षी वनडे पदार्पण करणाऱ्या जयवर्धनेने 186 पराभव देखील त्याच्या वनडे कारकिर्दीत पाहिले. पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये मिळून त्याने 3 शतके आणि 30 अर्धशतकांसह 4510 धावा केल्या आहेत.
4. शाहिद आफ्रिदी -170 पराभव
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या शाहिद आफ्रिदीने 19 वर्षांच्या वनडे कारकिर्दीत 398 वनडे सामने खेळले. पण यातील 170 सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभूत झालेल्या वनडे सामन्यांत मिळून त्याने 115 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 2884 धावा केल्या आहेत.
5. कुमार संगकारा – 167 पराभव
श्रीलंकेचा महान खेळाडू कुमार संगकाराने 15 वर्षांच्या वनडे कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरीने श्रीलंकेचा फक्त एक फलंदाज म्हणूनच नाही तर एक उत्तम यष्टीरक्षण आणि एक चांगला संघनायक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
2000मध्ये वनडे पदार्पण करणाऱ्या संगकाराने 404 वनडे सामने खेळले. पण यातील 167 सामन्यात त्याने पराभव स्विकारले आहेत. या पराभूत झालेल्या 167 सामन्यांमध्ये मिळून त्याने 5604 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतके आणि 36 अर्धशतके केली आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे जगातील २ दिग्गज, एक आहे भारतीय
पराभुत वनडे सामन्यात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे ५ फलंदाज
संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्ध लढाईत मदत केलेले ५ क्रिकेट बोर्ड, ज्यांचा भारतीयांना वाटेल कायमच अभिमान