क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो.
बऱ्याचदा तर विजयी संघाकडून चांगली आणि महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. पण काही वेळा किंवा खूप क्वचित असे होते की पराभूत होणाऱ्या संघातील एखाद्या खेळाडूला त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार दिला जातो.
वनडेमध्ये संघ पराभूत झाल्यानंतरही सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन वनडेमध्ये 200 सामने पराभूत झाला आहेत. त्यातील त्याला 6 वेळा भारत सामना पराभूत झाल्यानंतरही सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
त्याच्यापाठोपाठ जावेद मियाँदादला 5 वेळा संघ पराभूत झाल्यानंतरही सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या झिम्बाब्वेचे अँडी आणि ग्रँड हे फ्लॉवर बंधू, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचे इंझमाम उल हक आहेत. या चौघांनाही प्रत्येकी 4 वेळा त्यांचा संघ पराभूत झाल्यानंतरही वनडेत सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
याशिवाय 10 क्रिकेटपटू असे आहेत ज्यांना प्रत्येकी 3 वेळा त्यांचा संघ वनडेत पराभूत झाल्यानंतरही सामनावीर पुरस्कार मिळाला आहेत. तर 21 खेळाडूंना प्रत्येकी 2 वेळा त्यांचा संघ वनडेत पराभूत झाल्यानंतरही सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर 103 खेळाडूंना प्रत्येकी 1 वेळा त्यांचा संघ वनडेत पराभूत झाल्यानंतरही सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये संघ सामना पराभूत झाल्यानंतरही सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू –
6 सामनावीर – सचिन तेंडुलकर (200 सामने पराभूत)
5 सामनावीर – जावेद मियाँदाद (105 सामने पराभूत)
4 सामनावीर – अँडी फ्लॉवर (144 सामने पराभूत)
4 सामनावीर – ग्रँड फ्लॉवर (149 सामने पराभूत)
4 सामनावीर – ख्रिस गेल (141 सामने पराभूत)
4 सामनावीर – इंझमाम उल हक (148 सामने पराभूत)
ट्रेंडिंग घडामोडी –
संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्ध लढाईत मदत केलेले ५ क्रिकेट बोर्ड, ज्यांचा भारतीयांना वाटेल कायमच अभिमान
वनडेत १८३ धावा करा आणि टीम इंडियाचं कर्णधार बना
जेव्हा पंच असलेल्या वडिलांनी ‘बाप’ निर्णय घेत फलंदाज मुलाला दिले होते बाद