आयपीएल 2024 च्या 61व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत तिसरं स्थान पटकावलं. चेन्नईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघानं 5 गडी राखून विजय मिळवला. यासह चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये एका मैदानावर 50 सामने जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा पाच संघांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक विजय नोंदवले आहेत.
5) राजस्थान रॉयल्स (सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर) – 37 विजय : आयपीएलमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत राजस्थान रॉयल्स संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी त्यांच्या होम ग्राउंड जयपूरमध्ये 37 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सनं वेगवेगळ्या मैदानांवर एकूण 218 सामने खेळले आहेत, त्यापैकी 109 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
4) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू) – 42 विजय : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 254 सामने खेळले आहेत, त्यापैकी 120 सामने जिंकले आहेत. या दरम्यान, आरसीबीनं बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 42 सामने जिंकले आहेत.
3) चेन्नई सुपर किंग्ज (एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई) – 50 विजय : चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 238 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 138 सामने जिंकले आहेत. या कालावधीत संघानं चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर 50 विजयांची नोंद केली आहे.
2) मुंबई इंडियन्स (वानखेडे स्टेडियम, मुंबई) – 52 विजय : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावे आहे. तर हा संघ एका मैदानावर सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईनं वानखेडे स्टेडियमवर 52 सामने जिंकले आहेत.
1) कोलकाता नाइट रायडर्स (ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता) – 52 विजय : दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 249 सामने खेळले, ज्यापैकी 128 सामने जिंकले आहेत. या दरम्यान संघानं कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर 52 सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा घेऊ शकतो क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती, जाणून घ्या कारण
धोनीनं रविवारी चेपॉकमध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला? ‘गार्ड ऑफ ऑनर’ नंतर निवृत्तीच्या चर्चांना वेग
‘डिप्रेशन’ मधून बाहेर पडून बनला स्टार, आरसीबीमध्ये येताच पालटलं यश दयालचं नशीब!, जाणून घ्या आकडेवारी