---Advertisement---

या ५ खेळाडूंना मानले जाते सर्वाधिक आळशी क्रिकेटपटू; २ भारतीयांचाही समावेश

On: रविवार, मे 16, 2021 8:30 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांना जॉन्टी रोड्स आणि मोहम्मद कैफसारखे विलक्षण चपळ क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आहेत. रिकी पाँटिंग व विराट कोहलीच्या चपळतेनेही लाखो चाहत्यांची मने जिंकली आहे. परंतु असे नाही की केवळ चपळ खेळाडूंनीच क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे, आपण या लेखात बघणार आहोत असे 5 खेळाडू ज्यांना क्रिकेट मधील आळशी खेळाडूंमध्ये गणले जाते.

सर्फराज अहमद
पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद मैदानावर किती आळशी असायचा हे त्याने त्याच्याच कृतीतून अनेकदा सिद्ध केले आहे. त्याला अनेक वेळा यष्टीरक्षणा दरम्यान आळस देताना बघितले गेले आहे. त्याचबरोबर फलंदाजी करताना देखील तो खूप सुस्त जाणवतो. आपल्या आळशीपणामुळे सर्फराज अनेक वेळा ट्रोल झालेला आहे.

मुनाफ पटेल
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल मैदानावरील सुस्त खेळाडू मानला जात असे. मैदानावरील त्याची आळशी शैली ही संघाच्या कर्णधारासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. आळशीपणामुळे मुनाफ पटेलचा गोलंदाजी वेगही सतत कमी होत गेला. मुनाफ जोपर्यंत क्रिकेट खेळला तोपर्यंत तो आपल्या आळशी स्वभावासाठी ओळखला जात असे.

ख्रिस गेल 
वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक सुप्रसिध्द खेळाडूंमध्ये गणला जातो. पण गेलला धावा पळून काढणे अजिबात आवडत नाही. फलंदाजी दरम्यान अनेकदा त्याला पळून धावा काढणे अवघड जात होते.

केदार जाधव
केदार जाधवला आळशी म्हणण्यामागील कारण असे की, तो मैदानावर अधिक उत्साही दिसत नाही. तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू असूनही त्याचा उत्साह मैदानावर तेवढा जास्त नसतो. असे नाही की त्याची फीटनेस कमी आहे. परंतु तो क्षेत्ररक्षणादरम्यान इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत कमी उत्साही दिसतो.

इंझमाम-उल-हक
पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम-उल-हक हा सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये गणला जातो. मात्र इंझमाम-उल-हक हा देखील सर्वाधिक आळशी खेळाडूंमध्ये गणला जातो. विशेष बाब म्हणजे इंझमाम वनडेमध्ये 40 वेळा धावबाद झालेला आहे. इंझमाम क्षेत्ररक्षणात देखील अतिशय संथ होता.

महत्त्वाच्या बातम्या –

कौंटी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजांची शानदार कामगिरी, एकाच डावात घेतल्या ९ विकेट्स

नाचा रे! शुबमन गिल अन् कमलेश नागरकोटीसह थिरकले राणा दाम्पत्य, एकदा पाहाच हा डान्स व्हिडिओ

कोहलीवर टीका करणार्‍या वॉनला पाकिस्तानी खेळाडूची चपराक, म्हणाला “एकही वनडे शतक मारू न शकणार्‍यांनी…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---