---Advertisement---

टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी

---Advertisement---

चेन्नई | बहुचर्चित प्रो कबड्डी ६व्या हंगामाला उद्यापासून सुरूवात होत आहे. तमिल थलाईवाज विरुद्ध पाटणा पायरेट्स सामन्याने या हंगामाला सुरुवात होत आहे तर दुसरा सामना महाराष्ट्र डर्बी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुणेरी पलटन विरुद्ध यु मुंबा संघात होणार आहे.

प्रो कबड्डीचे पहिले ५ हंगाम मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरल्यानंतर चाहत्यांना ६व्या हंगामाकडूनही मोठी अपेक्षा आहे. याच पहिल्या ५ हंगामात अनेक विक्रम झाले. त्यातील हे आहेत ५ खास विक्रम-

-राहुल चौधरी हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी रेडर ठरला आहे. त्याने ७९ सामन्यात ६६६ गुण केवळ रेडिंगमधून घेतले आहे. तसेच एकूण ७१० गुणांची कमाई त्याने या ५ हंगामात केली आहे.

-पाटणा पायरेट्स संघ प्रो कबड्डीच्या ५ पैकी ५ हंगामात प्ले-आॅफसाठी पात्र ठरले आहेत. यात त्यांनी ३ विजेतेपदं मिळवली आहे.

-परदिप नरवाल जे तीन हंगाम खेळला आहे त्या सर्व हंगामात पाटणाने विजेतेपद मिळवले.

-एकाच हंगामात ३०० गुण घेणारा परदिप नरवाल हा एकमेव खेळाडू आहे.

-मनजीत चिल्लरने टॅकलमध्ये प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण कमावले आहे. त्याने ७४ सामन्यात २४३ गुण घेतले आहेत.

-प्रो कबड्डीच्या ५ हंगामात सर्वाधिक सुपर टेन घेण्याचा विक्रम राहुल चौधरीने केला आहे. त्याने ७९ सामन्यात ३२ वेळा अशी कामगिरी केली आहे.

-प्रो कबड्डीच्या ५ हंगामात सर्वाधिक हाय फाय घेण्याचा विक्रम मनजीत चिल्लर आणि सुरेंदर नाडा यांच्या नावावर आहे. मनजीतने ७४ तर नाडाने ७० सामन्यात १९वेळा हायफाय घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वाढदिवस विशेष: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

दोन्ही हातांनी गोलंदाजी करत या गोलंदाजाने रुट, मॉर्गनला टाकले गोंधळात

भावनिक रविंद्र जडेजाने कसोटीतील पहिले शतक केले या व्यक्तीला समर्पित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment