वेस्ट इंडिजची सर्वाधिक चर्चेत असणारी कॅरेबियन प्रिमियर लीग आपल्या आठव्या हंगामासाठी तयार झाली आहे. कोरोना व्हायरसदरम्यान या वर्षी सीपीएलचे आयोजन १८ ऑगस्ट ते १० डिसेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. ६ संघांमध्ये खेळण्यात येणाऱ्या टी२० मालिकेत जगभरातील क्रिकेटपटू सामील होतात. आणि आपली खेळी दाखवतात. जर या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये कॅरेबियन खेळाडूंचा दबदबा असलेला पहायला मिळतो.
चला तर मग जाणून घेऊया सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल
ख्रिस गेल
टी२० क्रिकेटचा दिग्गज आणि युनिवर्सल बॉस नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेलने या लीगमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. ४० वर्षीय गेलने आतापर्यंत ७६ सामन्यात ७४ डावांमध्ये ३९.२३ च्या सरासरीने २३५४ धावा केल्या आहेत. यादरम्यान गेलचा स्ट्राईक रेट हा १३३.४४ होता. गेलने आतापर्यंत ४ शतके आणि १३ अर्धशतके ठोकली आहेत. गेल या लीगमध्ये जमैका तलावाह्ज आणि सेंट किट्स संघाकडून खेळला आहे.
लेंडल सिमन्स
सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे वेस्ट इंडिजचाच धडाकेबाज फलंदाज लेंडल सिमन्स. त्याने आतापर्यंत ७१ सामन्यात ६९ डावांमध्ये ३३.०१ च्या सरासरीने २०८० धावा केल्या आहेत. गेलनंतर तो सीपीएलमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, ज्याने या लीगमध्ये २००० पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. सिमन्सची स्ट्राईक रेट यादरम्यान १२०.०९ इतका राहिला आहे. यादरम्यान त्याने १६ अर्धशतके ठोकली आहेत. सिमन्सने आतापर्यंत ५ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
आंद्रे फ्लेचर
सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आंद्रे फ्लेचरचा तिसरा क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत ६६ सामन्यांमध्ये ६६ डावात ३१.१६ च्या सरासरीने १८७० धावा केल्या आहेत. फ्लेचरने ११ अर्धशतके ठोकली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा ११७.३१ राहिला आहे. तो आतापर्यंत २ संघांकडून सेंट लुसिया स्टार्स आणि सेंट लुसिया झुक्सकडून खेळला आहे.
जॉनसन चार्ल्स
वेस्ट इंडिजचाच खेळाडू असलेला फलंदाज जॉनसन चार्ल्स सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ६८ सामन्यात ६८ डावात २७.९० च्या सरासरीने १८४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचबरोबर त्याने १३०.३६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. चार्ल्स आतापर्यंत ५ वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे.
चॅडविक वॉल्टन
सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चॅडविक वॉल्टनचा पाचवा क्रमांक लागतो. वॉल्टनने ७३ सामन्यांमध्ये ७३ डावात २६.५५ च्या सरासरीने १७७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा १२१.६८ राहिला आहे. त्याने सीपीएलमध्ये आतापर्यंत ९ अर्धशतके ठोकली आहेत. वॉल्टन गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स आणि जमैका तलावाह्ज संघाकडून खेळला आहे.
ट्रेंडिंग लेख –
-सलग १००पेक्षाही जास्त वनडे सामने खेळणारे ३ भारतीय लीजंड्स
-खरे अष्टपैलू! वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा व १०० विकेट्स घेणारे भारतीय महारथी…
-संघासाठी वाट्टेल ते! संघहितासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करणारे ५ निस्वार्थी भारतीय महारथी
महत्त्वाच्या बातम्या –
-ज्याने भारताविरुद्ध दिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून, आज पाकिस्तानने त्यालाच केले वॉटर बॉय
-जॉंटी रोड्सपेक्षाही खतरनाक झेल घेते ही मांजर, सोशल मीडियावर झालीय सुपरस्टार
-आयपीएलला टायटल स्पॉन्सर्सशिप देण्याबद्दल जिओने घेतला हा निर्णय