---Advertisement---

टॉप 5: प्रो कबड्डीच्या पहिल्याच दिवशी झाले हे खास विक्रम

On: सोमवार, ऑक्टोबर 8, 2018 3:53 PM
---Advertisement---

चेन्नई। रविवारी,7 आॅक्टोबर पासून प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांचा पहिला आणि पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बा यांचा दुसरा सामना पार पडला.

पहिल्या सामन्यात तमिळ थलायवाजने 42-26 अशा फरकाने विजय मिळवला. तसेच दुसरा सामना 32-32 असा बरोबरीचा झाला. या दोन्हीही सामन्यात सुपर टेन पहायला मिळाले.

पहिल्या सामन्यात तमिळ संघाकडून कर्णधार अजय ठाकूरने 14 गुणांची तर पटना संघाकडून कर्णधार परदीप नरवालने 11 गुणांची कमाई केली.

तसेच दुसऱ्या सामन्यात यू मुम्बाकडून सिद्धार्थ देसाई आणि पुणेरी पलटनकडून नितीन तोमरने प्रत्येकी 15 गुण मिळवले.

या दोन्ही सामन्यात खास विक्रमही झाले, ते असे- 

– महाराष्ट्र डर्बी म्हणजेच यू मुम्बा आणि पुणेरी पलटन यांच्यातील 12 सामन्यांपैकी पहिल्यांदाच सामना बरोबरीत संपला.

– यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने प्रो कबड्डीमधील पदार्पणाच्या सामन्यात सुपर टेन मिळवले.

– अजय ठाकूर हा पटना पायरेट्स विरुद्ध सलग चार सामन्यात सुपर टेन मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

– मनजीत चिल्लरने 5 टॅकल पॉइंट घेतले आहेत. त्यामुळे प्रो कबड्डीमध्ये पहिल्यांदाच 250 टॅकल पॉइंट पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 2 पॉइंट्सची गरज आहे. त्याचे आत्ता 248 टॅकल पॉइंट्स मिळवले आहेत.

– तमिळ थलायवाजने प्रो कबड्डीमध्ये 700 गुणांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो 12 वा आणि शेवटचा संघ ठरला.

– पटना पायरेट्स संघाला 1800 रेड पॉइंट्स मिळवण्यासाठी फक्त 10 पॉइंट्सची गरज आहे. त्यांनी आत्तापर्यंत 1790 रेड पॉइंट्स मिळवले आहेत. तसेच पटना हा सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारा संघ आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment