आजपर्यंत भारताचे तब्बल १९६ खेळाडू इंग्लंडविरुद्ध भारताकडून कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील १५९ खेळाडूंना इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.
भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने ३२ सामन्यात ५१.७३ च्या सरासरीने २५३५ धावा केल्या आहेत. यातील १७ सामन्यातील १५७५ धावा ह्या सचिनने इंग्लंडमध्ये केल्या आहेत.
भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सुनिल गावसकर (३८) यांच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्ध कमीतकमी १ हजार धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये राहुल द्रविडची सरासरी सर्वाधिक म्हणजे ६०.९३ आहे.
भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे हे आहेत ५ खेळाडू
२५३५- सचिन तेंडूलकर सामने- ३२
२४८३- सुनिल गावसकर, सामने- ३८
१९५०- राहुल द्रविड, सामने- २१
१८८०- गुंडप्पा विश्वनाथ, सामने-३०
१५८९- दिलीप वेंगसकर, सामने-२६
१५७०- विराट कोहली, सामने- १९
ट्रेंडिंग घडामोडी-
-तीन पिढ्यांना जोडणारा सचिन नावाचा भक्कम पुल
-सचिन तेंडूलकर आणि क्रिकेटवर्तुळात गाजलेले ५ वाद
-६ विश्वचषक सचिनने ते स्वप्न उराशी बाळगले व २०११ला ते पुर्ण झाले