आयपीएलच्या या हंगामात धावांचा पाऊस पडत आहे. फलंदाज एकापाठोपाठ एक गगनचुंबी षटकार लगावून रोज नवनवे विक्रम रचत आहेत. चला तर मग, आज आपण आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सर्वात लांब षटकार कोणी मारले हे जाणून घेऊया.
दिनेश कार्तिक : आयपीएलच्या या हंगामात सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत आरसीबीचा दिनेश कार्तिक पहिल्या क्रमांकावर आहे. कार्तिकनं चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा पराक्रम केला होता. या सामन्यात दिनेशनं 108 मीटर लांब षटकार ठोकला. कार्तिक 35 चेंडूत 83 धावा करून बाद झाला, ज्यामध्ये 7 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता.
हेनरिक क्लासेन : सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत हैदराबादचा हेनरिक क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं 106 मीटर लांब षटकार मारला. या सामन्यात क्लासेननं 31 चेंडूत 67 धावा केल्या. यामध्ये 7 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता.
निकोलस पूरन : सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत लखनऊचा निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आरसीबीविरुद्ध ही कामगिरी केली. पूरननं 106 मीटर लांब षटकार मारला होता. या सामन्यात त्यानं 21 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारांच्या मदतीनं 40 धावा केल्या.
व्यंकटेश अय्यर : केकेआरचा व्यंकटेश अय्यर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं आरसीबी विरुद्ध 106 मीटर लांब षटकार ठोकला होता. हा सामनाही चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात व्यंकटेशनं 30 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 50 धावा केल्या होत्या.
ईशान किशन : सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत मुंबईचा ईशान किशन पाचव्या स्थानावर आहे. ईशाननं हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 103 मीटर लांब षटकार ठोकला होता. या सामन्यात ईशान किशननं 13 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 34 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बाद झाल्यानंतर अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, विराट कोहलीला बीसीसीआयनं ठोठावला मोठा दंड
मैदानावर कुणी घेतला रोहित शर्माचा मुका? ‘हिटमॅन’नं पुढे काय केलं? पाहा VIDEO
आयपीएलच्या झगमगाटापासून दूर ‘या’ भारतीय खेळाडूनं कौंटी क्रिकेटमध्ये ठोकलं नाबाद द्विशतक