---Advertisement---

जगभरात किंग कोहलीचीच हवा! सुपरस्टार नेयमारलाही टाकले मागे

On: बुधवार, जून 5, 2024 3:48 PM
VIRAT KOHLI NEYMAR
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार विराट कोहलीचे आज जगभर चाहते आहेत. विराट त्याच्या अनेक कारणामुळे चाहत्यांना पसंत आहे. त्याची आक्रमकता, फलंदाजी काैशल्य आश्या अनेक कारणांमुळे चाहते त्याच्यावर फिदा आहेत. क्रिकेट सोबतच कोहली अनेक ब्रँडच्या जाहिराती देखील करतो. विराट कोहलीबाबत आता एक नवीन आकडेवारी समोर येत आहे. ज्यामध्ये विराट जगभरातील दुसरा सर्वांधिक फॉलोअर्स असणारा खेळाडू बनला आहे.

विराट कोहलीच्या लोकप्रियते मध्ये आणखी एक भर पडली आहे. खरं तर कोहलीने फुटबाॅल सुपरस्टार नेयमारला मागे टाकले आहे. सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म एक्स वर सर्वाधिक फाॅलो केले जाणाऱ्यांमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार 35 वर्षीय विराट कोहलीचे सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘X’ वर 6.35 करोड फॉलोअर्स झाले आहेत. जे 32 वर्षीय ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय फुटबाॅलपटू नेयमारला काही अंतराच्या आकड्याने मागे टाकले आहे. नेयमारचे सध्या 6.34 करोड फॉलोअर्स आहेत. तर याबाबतीत क्रिस्टियानो रोनाल्डो कडे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. रोनाल्डो 11.14 करोड फॉलोअर्स सोबत अव्वल स्थानी आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने अलीकडेच 120 नॉट आउट पॉडकास्टवर कोहलीचे कौतुक केले. त्याला “क्रीडा जगतातील जागतिक सुपरस्टार” असे संबोधले आणि त्याच्या लोकप्रियतेची तुलना लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोशी केली.

विराट कोहलीचे इंस्टाग्राम वर जवळपास 27 करोड फॉलोअर्स आहेत आणि तो 302 लोकांना फाॅलो करतो तर फेसबूक पेजवर कोहलीचे 5.1 करोड फॉलोअर्स असून तो 24 लोकांना फाॅलो करत आहे.

महत्तवाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यापूर्वी पाकिस्तानचा ‘हा’ फिरकीपटू बाहेर
रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी, धोनीला मागे टाकून बनेल भारताचा नंबर-1 कर्णधार
शिवम दुबेची तुलना चक्क कपिल देव यांच्याशी! सीएसकेच्या कोचचं धक्कादायक वक्तव्य

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---