शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) ८ व्या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. हा सामना दबंग दिल्ली आणि पाटना पायरेट्स (Dabang Delhi And Patna Pirates) संघात झाला. या सामन्यात दबंग दिल्लीने ३७-३६ अशा फक्त १ गुणाच्या फरकाने पाटना पायरेट्सला पराभूत केले. यासोबतच दिल्लीने प्रो कबड्डीचे पहिले वहिले किताब आपल्या नावावर केले. चौथ्यांदा प्रो कबड्डीची ट्रॉफी आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने अंतिम सामन्यात उतरलेल्या पाटना संघाचं स्वप्न धुळीस मिळालं.
यावेळी रेडर विजय मलिक आणि नवीन कुमार हे दिल्लीच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. विजय मलिकने रेड मारत १४, तर नवीन कुमारने १३ गुण आपल्या नावावर केले होते. मात्र, या हंगामाच्या स्टार रेडरबद्दल बोलायचं झालं, तर तो आहे बेंगळुरू बुल्सचा पवन कुमार सेहरावत (Pawan Kumar Sehrawat). पवनने २४ सामन्यात एकूण ३०४ गुण मिळवले आहेत. हा झाला या हंगामाचा स्टार रेडर, पण यापूर्वी झालेल्या ७ हंगामातील स्टार रेडरबद्दल तुम्हाला माहितीये का? नसेल, तर चला जाणून घेऊया…
प्रो कबड्डी लीगच्या प्रत्येक हंगामात सर्वाधिक गुण मिळवणारे रेडर्स
१. २०१४- पहिला हंगाम- अनुप कुमार (यू मुंबा)- १५५ गुण
२. २०१५- दुसरा हंगाम- काशीलिंग अडके (दबंग दिल्ली)- ११४ गुण
३. २०१६- तिसरा हंगाम- परदीप नरवाल (पाटना पायरेट्स)- ११६ गुण
४. २०१६- चौथा हंगाम- राहुल चौधरी (तेलुगू टायटन्स)- ११४ गुण
५. २०१७- पाचवा हंगाम- परदीप नरवाल (पाटना पायरेट्स)- ३६९ गुण
६. २०१८- सहावा हंगाम- पवन सेहरावत (बेंगळुरू बुल्स)- २७१ गुण
७. २०१९- सातवा हंगाम- पवन सेहरावत (बेंगळुरू बुल्स)- ३४६ गुण
८. २०२२- आठवा हंगाम- पवन सेहरावत (बेंगळुरू बुल्स)- ३०४ गुण
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी फायनल : पाटना पायरेट्सला लोळवत दबंग दिल्ली विजयी, प्रथमच पटकावले विजेतेपद
Ranji Trophy: तमिळनाडूसाठी जुळ्या भावांचा एकत्रच शतकी दणका, तर दिग्गजांकडून निराशा