आयपीएलमध्ये बऱ्याचदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळते. या स्पर्धेत सर्वच संघ मालक अशा फलंदाजांचा शोध घेतात जे सातत्यपूर्ण कामगिरी करतात. एक चांगला फलंदाज संघाची धावसंख्या सुधारू शकतो आणि संघ मजबूत बनवतो. सामन्यात जितकी धावसंख्या जास्त तितकीच त्या संघाच्या विजयाची संधी असते.
या स्पर्धेत असे अनेक फलंदाज आहेत जे संघासाठी सातत्याने उत्तम कामगिरी करत आहेत आणि जवळजवळ प्रत्येक सामन्यात धावा जमवतात. म्हणूनच या लेखात अशा ५ फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत जे ५० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत आणि यावेळी त्यांची फलंदाजी सरासरी आयपीएलमधील सर्वोच्च आहे.
५. एबी डिव्हिलियर्स – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
दक्षिण आफ्रिका आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. एबी नेहमीच बेंगलोर संघाचा एक महत्वाचा घटक राहिला आहे. बेंगलोरचा संपूर्ण संघच कर्णधार कोहली आणि डिव्हिलियर्स यांच्यावर अवलंबून असल्याचे दिसते.
डिव्हिलियर्सने मागील हंगामातील १३ सामन्यांमध्ये ४४ पेक्षा जास्त सरासरीने ४४२ धावा केल्या. यावेळी त्याने ५ अर्धशतके झळकावली. यावेळी, त्याची सर्वाधिक धावसंख्या ९९ अशी होती. त्याचबरोबर त्याची आयपीएल कारकिर्द म्हणजे डिव्हिलियर्सने आयपीएलमधील १५४ सामन्यांत ३९.९५ च्या सरासरीने ४३९५ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ३ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आहेत.
४. ख्रिस गेल – किंग्ज इलेव्हन पंजाब
वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल नेहमीच आयपीएलचा मोठा चेहरा ठरला आहे. ख्रिस गेलने आयपीएलमधील मोठ्या षटकारांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे सातत्याने मनोरंजन केले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रमही या खेळाडूच्या नावे आहेत. त्याने पुण्याच्या विरुद्ध १७५ धावांची विक्रमी खेळी खेळली.
आयपीएलच्या मागील मोसमातही ख्रिस गेलने पंजाबच्या संघाकडून शानदार खेळ दाखविला. गेलने मागील मोसमात १३ सामन्यांत ४० च्या सरासरीने ४९० धावा केल्या आहेत. तर त्याने फलंदाजीने ४ अर्धशतके झळकावली. यावेळी त्यांची सर्वाधिक धावसंख्या नाबाद ८२ अशी होती.
त्याचबरोबर त्याची एकूण आयपीएल कारकिर्द म्हणजे गेलने आयपीएलमधील १२५ सामन्यांत ४१.१३ च्या सरासरीने ४४८४ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ६ शतके आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत.
३. केएल राहुल – किंग्ज इलेव्हन पंजाब
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) या मोसमात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर केएल राहुल किंग इलेव्हन पंजाबचा कर्णधार म्हणून काम करणार आहे. राहुलने पंजाब संघात प्रवेश केला तेव्हापासून त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आणि भारतीय संघ या दोघांसाठीही चांगली कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या मागील मोसमातही राहुलने पंजाबकडून बऱ्याच धावा केल्या. राहुलने मागील मोसमातील १४ सामन्यात ५३.९ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या. यावेळी, त्याच्या फलंदाजीद्वारे एक शतक आणि ६ अर्धशतके ठोकली गेली.
त्याचबरोबर त्याने आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकीर्द ६७ सामन्यात ४२.०६ च्या सरासरीने १९७७ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने १ शतक आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.
२. एमएस धोनी – चेन्नई सुपर किंग्ज
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंगचा सध्याचा कर्णधार एमएस धोनीने चेन्नईला ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. रोहित शर्मानंतर धोनी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने नेहमीच कठीण काळात आपल्या संघासाठी मैदानात येऊन चांगली फलंदाजी केली आहे.
आयपीएलच्या मागील मोसमातही धोनीने सर्वाधिक सरासरी नोंदविली होती. त्या हंगामातील १५ सामन्यांमध्ये धोनीने ८३ पेक्षा जास्तच्या सरासरीने ४१६ धावा केल्या. त्यावेळी त्याच्या फलंदाजीतुन कोणतेही शतक नव्हते, परंतु त्याने ३ अर्धशतके झळकावली होती.
आयपीएलमधील आतापर्यंतच्या कारकीर्दीत धोनीने एकूण १९० सामन्यात ४२.२० च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या आहेत. यात त्याने २३ अर्धशतके झळकावली आहेत.
१. डेव्हिड वॉर्नर – सनरायझर्स हैदराबाद
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग झाल्यापासून संघासाठी सातत्याने धावा काढत आहे. आयपीएलमधील विराटनंतर वॉर्नर हा एकमेव फलंदाज आहे ज्याने जवळजवळ प्रत्येक सामन्यात फलंदाजी करून धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या मागील मोसमात वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादकडून बऱ्याच धावा केल्या. त्याने स्वत: चे नाव ऑरेंज कॅपवर कोरले होते. वॉर्नरने मागील मोसमातील १२ सामन्यात ६९.२ च्या सरासरीने ६९२ धावा केल्या. त्यावेळी, त्याच्या फलंदाजीतून एक शतक आणि ९ अर्धशतकं ठोकली गेली.
आयपीएलमधील आतापर्यंतच्या कारकीर्दीत वॉर्नरने एकूण १२६ सामन्यात ४३.१७ च्या सरासरीने ४७०६ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ४ शतके आणि ४४ अर्धशतके झळकावली आहेत.
ट्रेंडिंग लेख –
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती
वाढदिवस विशेष- ४९ वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ५: लक्ष्मणची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळी