भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ओल्या मैदानमुळे टाॅसला उशीर झाला होता. दरम्यान आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पहिल्या डावात बांग्लादेशचा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. हा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियम येथे खेळवला जात आहे. तत्तपर्वी 2 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली असून हा सामना जिंकून पाहुण्या संघाला क्लीन स्वीप करण्याचे प्रयत्न रोहित आणि कंपनीसमोर नक्कीच असेल. सामना भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता सुरु होईल.
भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला आहे. मागील सामन्यातील टीम खेळताना पाहायला मिळेल. म्हणजेच टीम इंडिया दोन फिरकीपटू तीन वेगवान गोलंदाजांसह खेळणार आहे. बांग्लादेशबद्दल बोलायचे झाल्यास संघाने 2 बदल केले. तैजुल इस्लाम आणि खालेद अहमद यांचा समावेश करण्यात आले आहे.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा संकटमोचक रविचंद्रन अश्विनची शानदार अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. त्याच्या सोबत रवींद्र जडेजाने देखील मोलाची भूमिका बजावली. तर दुसऱ्या डावात रिषभ पंत आणि शुबमन गिल यांची शतकी खेळी पाहायला मिळली. एकंदरीत भारतीय संघ पहिल्या सामन्यात बांग्लादेशला एकतर्फी मात दिला. दरम्यान आता दुसऱ्या सामन्यात बांग्लादेश कमबॅक करणार का? हे पाहणे रंजक राहील.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत- यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांग्लादेश- शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो(कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद
हेही वाचा-
रिषभ पंतसाठी एमएस धोनीला मागे टाकणे सोपे नाही, या बाबतीत माही टाॅपवरच..
धोनीच्या विश्वासू खेळाडूची निवृत्ती; क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा
147 वर्षांच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही, श्रीलंका-न्यूझीलंड सामन्यात हा मोठा पराक्रम