आगामी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये मानाची ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. ही मालिका डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी मार्श चषक २०२१ ही वनडे स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने दुहेरी शतक झळकावून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
मार्श चषक २०२१ स्पर्धेत क्वीन्सलॅंड आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ट्रेविस हेडने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत दुहेरी शतक झळकावले आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करण्यासाठी दार देखील ठोकले आहे. त्याला भारतीय संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर केले होते.
ट्रेविस हेडने अवघ्या १२७ चेंडूंमध्ये २३० धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान ट्रेविस हेडने २८ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले होते. त्याने १६० धावा तर चौकार आणि षटकार मारूनच केल्या. ही खेळी मार्श चषक स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.
यापूर्वी २०१८ मध्ये डार्सी शॉर्टने २५७ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. तसेच ६ वर्षांपूर्वी हेडने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २०२ धावांची खेळी केली होती. हेड व्यतिरिक्त ३ असे ऑस्ट्रेलियन फलंदाज आहेत, ज्यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये दुहेरी शतक पूर्ण करण्याचा पराक्रम आहे. यामध्ये डार्सी शॉर्ट, बेन डंक आणि फिलिप ह्यूज यांचा समावेश आहे.
Travis Head is in a mood!
15 fours and three sixes to his name so far.
Watch the #MarshCup live: https://t.co/cQ18WIfNBi pic.twitter.com/pAn5qUhIpB
— cricket.com.au (@cricketcomau) October 13, 2021
ट्रेविस हेडने २०० धावा करण्याचा पराक्रम ११४ चेंडूंमध्ये केला होता. ९७ धावांवर फलंदाजी करत असताना त्याने लेग साईडला षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. या खेळीसह तो ऑस्ट्रेलिया संघासाठी दोन दुहेरी शतक झळकावणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. तर क्वीन्सलॅंड संघाविरुद्ध शतक झळकावून त्याने आपल्या कारकिर्दीतील ९ वे शतक झळकावले आहे. हा डाव सुरू असताना पावसाचे आगमन झाले होते. ज्यामुळे दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात ४८ षटकात ८ बाद ३९१ धावा करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! शार्दुल ठाकूरची टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान
केकेआरला सात वर्षांनंतर जिंकायचीय ट्रॉफी; मात्र, सेनापतीच्या बॅटला लागलाय गंज






