ऑस्ट्रेलियाला विश्वचषक 2023 मधील आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले आहेत. त्यांना पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून मात दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल 137 धावांनी त्यांना पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून त्यांनी काही प्रमाणात या अपयशाची भरपाई केली. या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. असे असताना आता ऑस्ट्रेलियन संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच सलग दोन पराभव पहावे लागले. भारतीय संघाविरुद्ध विजयाची संधी असताना देखील खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तब्बल सहा झेल त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी सोडले. विशेष म्हणजे त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज दोन्ही सामन्यात सपशेल अपयशी ठरले.
Travis Head is set to travel to India to join the Australian team at #CWC23 🙌https://t.co/o8QSifFkSX
— ICC (@ICC) October 15, 2023
या स्थितीत आता ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रेविस हेड हा तंदुरुस्त होत असल्याचे वृत्त समोर येतेय. विश्वचषकाआधी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याच्या हाताला दुखापत झाली होती. तो ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघाचा सदस्य आहे. असे असले तरी तो अद्याप सिडनी येथेच असून, तंदुरुस्तीतून सावरतोय.
हेड याने शनिवारपासून सरावाला सुरुवात केली असून, तो तंदुरुस्त असल्याचे दिसतोय. त्यामुळे तो गुरुवारी भारताकडे प्रयाण करेल. पाकिस्तानविरुद्ध चौथ्या सामन्यात तो खेळताना दिसणार नाही. मात्र, 25 ऑक्टोबर रोजी नेदरलँड विरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज असेल.
दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने सोमवारी श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केले. यामुळे त्यांनी आता गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर जागा पटकावली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी सर्वच गोलंदाजांनी व प्रमुख फलंदाजांनी योगदान देत विजय साकार केला.
(Travis Head is set to travel to India to join the Australian team at World Cup)
महत्वाच्या बातम्या –
हम खडे, तो सबसे बडे! रोहितच्या 6 षटकारांनी रचला मोठा Record, सचिनसह स्वत:चे 3 विक्रम काढले मोडीत
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ पठ्ठ्या ठरला फिल्डर ऑफ द मॅच, शार्दुलच्या हस्ते सन्मान