---Advertisement---

मोहम्मद सिराजला मोठा झटका, आयसीसीने केली कारवाई; ट्रॅव्हिस हेडची सुटका!

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 6:18 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत कांगारू संघानं 10 गडी राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने त्याच्यावर मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे.

सिराजला ही शिक्षा ट्रॅव्हिस हेडसोबत झालेल्या बाचाबाचीसाठी मिळाली. आश्चर्याचं म्हणजे, आयसीसीनं ट्रॅव्हिस हेडला कोणताही दंड ठोठावला नाही. आयसीसीनं या दोघांनाही 1-1 डिमेरिट पॉइंट दिला आहे. आयसीसीनं सांगितलं की, “सिराज आणि हेडला शिस्तभंगासाठी 1-1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला, जो गेल्या 24 महिन्यांतील त्यांचा पहिला गुन्हा आहे.” सिराज आणि हेडची गेल्या 24 महिन्यांतील ही पहिलीच चूक होती. त्यामुळे कोणावरही बंदी घालण्यात आली नाही. दोघेही 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन कसोटीत खेळू शकतात.

ॲडलेड कसोटीदरम्यान सिराज आणि हेड यांच्यात बाचाबाची झाली होती. हेडला बाद केल्यानंतर सिराजनं त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला होता. पॅव्हेलियनमध्ये परतताना हेडही सिराजला काहीतरी बोलला होता. आयसीसीनं सिराजला आचारसंहितेच्या कलम 2.5 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. या कलमानुसार खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफविरुद्ध अपशब्द वापरल्यास कारवाई केली जाते.

सिराज आणि हेड यांनी आपली चूक मान्य करत सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्यासमोर आरोप स्वीकारले आहेत. त्यामुळे सुनावणीची गरज भासली नाही. आयसीसीनं दोघांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

सामन्यानंतर मोहम्मद सिराजनं या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली होती. स्टार स्पोर्ट्सवर हरभजन सिंगसोबत झालेल्या संवादात सिराज म्हणाला होता की हेडला बाद केल्यानंतर त्यानं फक्त आनंद साजरा केला होता. तो काहीच बोलला नव्हता, मात्र हेडनं त्याला उत्तर दिलं, असं सिराजचं सांगितलं. ट्रॅव्हिस हेडनं पत्रकार परिषदेत खोटं सांगितलं, असा दावाही सिराजनं केला आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ट्रॅव्हिस हेड म्हणाला होता की त्यानं सिराजला, “चांगला बॉल टाकला” असं म्हटलं होतं. या प्रकरणाला फारसं महत्त्व द्यायचे नसल्याचंही हेड म्हणाला होता.

हेही वाचा – 

जय शाहंचा उत्तराधिकारी! या व्यक्तीला मिळाली बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी
दक्षिण आफ्रिका WTC फायनलपासून केवळ एक पाऊल दूर, भारताच्या अडचणी वाढल्या
डीएसपी मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? पदवी नसूनही नियुक्ती कशी झाली?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---