सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना चकित केलं होतं. मात्र आयपीएलच्या साखळी फेरीनंतर ट्रॅव्हिस हेडच्या बॅटमधून धावांच निघाल्या नाहीत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मिचेल स्ट्रार्कनं हेडला गोल्डन डक वर तंबूत पाठवलं होत. फायनल सामन्यातही तो शून्यावर तंबूत परतला. वैभव अरोरानं त्याची विकेट घेतली.
ट्रॅव्हिस हेडनं या हंगामात 15 सामन्यात 567 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. संपूर्ण आयपीएल गाजवणाऱ्या ट्रेव्हिस हेडच्या नावावर जाता जाता लाजीरवाणा विक्रम नोंदवला आहे. आयपीएल फायनलमध्ये डक स्कोर करणाऱ्या सलामीवीरमध्ये सातवा फलंदाज बनला आहे.
आयपीएल फायनलमध्ये डक स्कोर करणारे सलामीवीर
ॲडम गिलख्रिस्ट (2009)
शिखर धवन (2010)
ख्रिस गेल (2011)
आदित्य तरे (2013)
पार्थिव पटेल (2015)
मार्कस स्टॉइनिस (2020)
ट्रॅव्हिस हेड (2024)*
सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवाच खूपच खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात बोल्ड झाला. स्टार्कनं त्याची विकेट घेतली. त्यानं 5 चेंडूत 2 धावा केल्या. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वैभव अरोरानं त्याची विकेट घेतली. राहुल त्रिपाठी 9 आणि एडन मार्करम 20 धावा करून तंबूत परतले.
बर्थडे बॉय नितीश रेड्डी काही कमाल करू शकला नाही. तो 13 धावा करून बाद झाला. भरवश्याचा फलंदाज क्लासेननं 17 चेंडूत 16 धावा केल्या. शाहबाज अहमद 8 आणि इम्पॅक्ट प्लेअर अब्दुल समदनं 4 धावा केल्या. कोलकाताकडून आंद्रे रसलनं 3 आणि स्टार्क व हर्षित राणानं 2-2 विकेट घेतल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर
कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
अरे.. ही कोणती पद्धत ! आयपीएल फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरनं आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली नाणेफेक
मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू! आयपीएल फायनलमध्ये मिचेल स्टार्कचा कहर, हैदराबादचे फलंदाज थयथय नाचले