---Advertisement---

मिड ऑनवर धवनचा सुपर झेल, मग गब्बर स्टाईल सेलिब्रेशनही; हा शानदार क्षण तुम्ही पाहिलाय ना?

On: सोमवार, जुलै 19, 2021 9:55 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्याची जोरदार सुरुवात केली आहे. रविवारी (१८ जुलै) पार पडलेल्या सामन्यात,भारतीय संघाने श्रीलंका संघावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात कर्णधार शिखर धवनने एक अप्रतिम झेल टिपला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.

शिखर धवन हा भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याच्या हातातून झेल क्वचितच सुटतो. तर झाले असे की गेल्या काही महिन्यांपासून संघात संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कुलदीप यादवला या सामन्यात संधी देण्यात आली होती. या संधीचे त्याने सोने देखील केले. (Tremendous catch taken by Indian captain shikhar dhawan watch video)

धवनचा अप्रतिम झेल
श्रीलंका संघाकडून डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज भानुका राजपक्ष फलंदाजी करत होता. त्यावेळी १७ वे षटक टाकण्यासाठी कर्णधार शिखर धवनने कुलदीप यादवला गोलंदाजीला बोलवले होते. या षटकातील पहिलाच चेंडू कुलदीपने शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न फसला आणि चेंडू सरळ हवेत गेला व मिड ऑनवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या शिखर धवनने धावत जाऊन डाइव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर त्याने गब्बर स्टाईल सेलिब्रेशन देखील केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा जोरदार विजय
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत होता. प्रथम फलंदाजी करताना त्यांना ५० षटक अखेर ९ बाद २६२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी केली होती. तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या इशान किशनने पदार्पणाच्या सामन्यात जोरदार अर्धशतक झळकावत ५९ धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ३६.४ षटकात ७ गडी शिल्लक असताना आपल्या नावावर केला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---