नुकताच फीफा विश्वचषक 2022 अंतिम सामना कतार मधील लुसेल स्टेडीयम येथे खेळवला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स या संघात खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रासंवर विजय मिळवला. अर्जेंटिना जिंकली म्हणून आनंद फक्त अर्जेंटिनाच्या लोकांना झाला असे नाही. भारतातही प्रचंड प्रमाणात जल्लोष बघायला मिळाला. मात्र, हा जल्लोष सोशल मीडियापूरता मर्यादित होता, पण महाराष्ट्रात यापेेक्षाही पुढे जाऊन जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये अर्जेंटिना जिंकल्यानंतर चक्क डीजे लावण्यात आला आणि त्यावर कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी बेभान नृत्य केले.
महाराष्ट्रात खेळाच्या प्रेमापोटी चाहते काय करतील याचा काही नेम नाही. असेच काहीसे फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्यावेळी बघायला मिळाले. कोल्हापूर हा फुटबॉलप्रेमींचा जिल्हा म्हणून ओळखले जातो. विश्वचषक सुरु असताना कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या संघांच्या समर्थनार्थ स्टार खेळाडूंचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये फीफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी रस्त्यावर स्क्रिन लावून सामना बघण्यात आला आणि हा सामना अर्जेंटिनाने जिंकल्यावर डीजे लावून कोल्हापूरचे फुटबॉलप्रेमी मनसोक्त नाचले. त्यांचा हा नाचतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोल्हापूरकरांच्या या कृतीने पुन्हा सिद्ध झाले की खेळाला भौगोलिक सीमांचे बंधन नसते आणि जगातील कोणत्याही संघाचे चाहते जगभरात कुठेही असू शकतात.
जर सामन्याविषयी बोलायचे झाले तर, अर्जेंटिनाने हा सामना पेनाल्टी शूटआऊटमध्ये 4-2ने जिंकला. याआधी पहिल्याा हाफमध्ये अर्जेंटिनाने 2-0ने फ्रान्सवर आघाडी मिळवली. मात्र, सामन्याच्या 80व्या आणि 81व्या मिनीटाला फ्रान्सच्या किलीयन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याने सलग 2 गोल करत 2-2ने बरोबरी केली. त्यानंतर अधिकचे 30 मिनीट देण्यात आलेे. त्यात अर्जेंटिनासाठी लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि फ्रान्ससाठी एम्बाप्पे यांनी गोल करत पुन्हा सामना 3-3च्या बरोबरीवर आला. नंतर पेनाल्टी शूटआऊटने या सामन्याचा निकाल लागला. अर्जेेंटिनाने 4-2ने फ्रान्सवर मात केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीतूनही रोहित शर्माची माघार, केएल राहुलकडे पुन्हा नेतृत्वकौशल्य दाखवण्याची संधी
ट्रॉफीचे चुंबन आणि स्टेजवर डान्स; विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनल मेस्सीने ‘असा’ केला जल्लोष