Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या कसोटीतूनही रोहित शर्माची माघार, केएल राहुलकडे पुन्हा नेतृत्वकौशल्य दाखवण्याची संधी

दुसऱ्या कसोटीतूनही रोहित शर्माची माघार, केएल राहुलकडे पुन्हा नेतृत्वकौशल्य दाखवण्याची संधी

December 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या संघातून बाहेर आहे. रोहित संघासोबत बांगालदेश दौऱ्यावर होता. पण दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहित वनडे मालिकेतील शेवटचा सामना आणि कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. अशातच आता बांगालदेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून देखील रोहित शर्मा माघार घेत असल्याचे समोर येत आहे.

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळत नसल्यामुळे केएल राहुल (KL Rahul) नेतृत्व करत होता. राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पहिला कसोटी सामना 188 धावांनी जिंकला. अशात दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील आता राहुल संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असेल. रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील खेळू शकणार नसल्यामुळे राहुलला पुन्हा एकदा स्वतःचे नेतृत्वगुण दाखवण्याची संधी या सामन्यात मिळेल. उभय संघांतील हा दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबर (गुरुवार) मिरपूरमध्ये सुरू होईल. (Rohit Sharman also withdrew from the second Test match against Bangladesh)

Rohit Sharma is likely to be available from the series against Sri Lanka starting on January 3rd. (Source – Cricbuzz)

— Johns. (@CricCrazyJohns) December 19, 2022

बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 26 डिसेंबर रोजी संपणार असून संघाला त्यानंतर मायदेशात श्रीलंका संघाविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. श्रीलंका संघ तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा संघात उपस्थित असेल, अस सध्या सांगितले जात आहे. बांगालदेशविरुद्ध रोहितने शेखलेल्या शेवटच्या सामन्यात तो संघासाठी मॅच विनर ठरू शकत होता.

संघाने प्रथम गोलंदाजी करताना बांगालदेशला 7 बाद 271 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात रोहित शर्माने शेवटच्या चेंडूपर्यंत संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, पण असे होऊ शकले नाही. संघाला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर 12 धावांची आवश्यकता होती. रोहितने षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार मारला, पण शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार मारता आला नाही. भारताने 5 धावा कमी पडल्यामुळे हा सामना मगावला. या वनडे मालिकेत संघाला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 
हे सामर्थ्य नाशवंत नाही! दु:खात बुडालेल्या एम्बाप्पेचेे फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केले सांत्वन, पाहा व्हिडीओ
अर्जेंटिनाच्या विश्वविजयाचे स्वप्न साकार करणारा मार्टिनेझ ठरला गोल्डन ग्लोव्हजचा मानकरी; अशी आहे आजवरची यादी 


Next Post
Emiliano Martinez Vulgure gesture

हे वागणं बरं नव्हं! गोल्डन ग्लोव विजेत्याकडून अश्लील कृत्य, नेटकरी भलतेच संतापले

Kolhapur Dance after Argentina's win

नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठं! अर्जेंटिना जिंकताच डीजेवर बेभान होऊन नाचले फुटबॉलप्रेमी, पाहा व्हिडीओ

Kylian Mbappe Golden Boot winner

फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143