राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थानने 5 बाद 203 धावा उभारल्या. यानंतर गोलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानला त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच षटकात दोन बळी मिळवून देत सामन्यात पुढे केले.
𝗧𝗵𝘂𝗻𝗱𝗲𝗿 𝗕𝗼𝘂𝗹𝘁! ⚡️⚡️
𝐖 0 𝐖 😉
A shaky start to #SRH's chase as they lose Abhishek Sharma & Rahul Tripathi in the first over of the chase!
Follow the match ▶️ https://t.co/khh5OBILWy#TATAIPL | #SRHvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/NwtSFWZbwX
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
तीन फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण करत राजस्थानला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारून दिली. विजयासाठी मिळालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला चांगल्या सुरुवातीची गरज होती. मात्र, त्यांना अशी सुरुवात करण्यात अपयश आले. पहिले दोन चेंडू योग्य टप्प्यावर टाकल्यानंतर बोल्टने तिसरा चेंडू यॉर्कर टाकला. त्यावर अभिषेक शर्मा पूर्णपणे चकला व त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठी याने त्याला पुढे सरसावत येऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेरची कड घेऊन उडालेला चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जेसन होल्डर याने डावीकडे झेपावत टिपला. बोल्टने हे षटक निर्धाव टाकत राजस्थानला स्वप्नवत सुरुवात दिली. आपल्या आयपीएल कारकिर्दीत दुसऱ्यांदा त्याने असा कारनामा केला.
तत्पूर्वी, सामन्यातील पहिल्या डावाचा विचार केल्यास, राजस्थानने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर ही संधी दोन्ही हातांनी पकडली. जोस बटलर व यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला 6 षटकात 85 धावांची तुफानी सलामी दिली. दोघांनी प्रत्येकी 54 धावा केल्या. त्यानंतरच कर्णधार संजू सॅमसननेही अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस हेटमायर याने काही मोठे फटके खेळत राजस्थानला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.
(Trent Boult Double Strike In First Over Agaist SRH In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर डेविड वॉर्नर नाखुश? पराभवानंतर काय म्हणाला पाहाच
सराव सामन्यात धोनीने ठोकला गगनचुंबी षटकार, पाहून सर्वांना झाली 2011 वर्ल्डकपची आठवण, पाहा व्हिडिओ
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट