नवी दिल्ली | आयपीएल 2020 च्या 41 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्सला केवळ 114 धावांवर रोखले. पॉवरप्लेच्या 6 षटकातच चेन्नईने 5 गडी गमावले होते. मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने टाकलेल्या पहिल्या 3 षटकातच स्विंगच्या सहाय्याने चेन्नईला चारी मुंड्या चित केले. बोल्टने चेन्नईविरुद्ध 4 षटकांत 18 धावा देऊन 4 गडी बाद केले.
एमएस धोनी, फाफ डुप्लेसिस आणि अंबाती रायुडूसारख्या स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नई संघाने आपले 5 गडी केवळ 21 धावांत गमावले होते.
चेन्नईच मोडलं कंबरडं
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकातच चेन्नईला धक्का दिला. पाचव्या चेंडूवर त्याने चेंडू स्विंग करत सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पायचीत केले. ऋतुराजला धावांचे खातेही उघडता आले नाही. त्याच्या दुसर्या षटकातील पाचव्या चेंडूवर बोल्टने पुन्हा एकदा चेन्नईला मोठा धक्का दिला. त्याने चेन्नईचा अनुभवी फलंदाज डुप्लेसिसला त्याच्या आउट स्विंगवर तंबूचा मार्ग दाखवला. डुप्लेसिस फक्त एक धाव करू शकला. यानंतर बोल्टने रवींद्र जडेजाची विकेट घेत चेन्नईची दयनीय अवस्था केली.
जडेजाने बोल्टच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षक क्रुणाल पांड्याने त्याचा झेल घेतला. तो केवळ 7 धावा करून तंबूत परतला. पॉवरप्लेमध्ये चेन्नईने 5 गडी गमावले होते. यानंतर धोनी 16 धावा काढून बाद झाला.
हंगामात बोल्टने पॉवरप्लेमध्ये केली दमदार कामगिरी
आयपीएल 2020 मध्ये पॉवरप्लेदरम्यान ट्रेंट बोल्टने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. या हंगामात त्याने पॉवरप्लेमध्ये 24 षटके टाकली आहेत, ज्यात त्याने 10 बळी घेतले आहे. पॉवरप्लेमधील ही कामगिरी ट्रेंट बोल्टच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी बोल्टने 2015 to ते 2019 पर्यंत पॉवरप्लेमध्ये 9 गडी बाद केले होते. या हंगामात त्याने दहा सामन्याताच या आकड्यांना मागे टाकले आहे.
बोल्टला आयपीएल 2020 मध्ये नव्हते खेळायचे
ट्रेंट बोल्ट आयपीएल 2020 मध्ये न खेळण्याचा विचार करीत होता. कोरोना विषाणूमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आले होते. जेव्हा बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल स्पर्धेची घोषणा केली तेव्हा बोल्ट म्हणाला होता की, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आयपीएल खेळण्याबाबत नंतर निर्णय घेऊ. तथापि, नंतर बोल्टने यात खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता तो मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राहिलेल्या ३ मॅच खेळणार का? पाहा काय होते धोनीचे उत्तर
नेहमी खिशात लाकडाचा तुकडा घेऊन फिरतो दिल्लीचा अष्टपैलू, काय आहे यामागचं गुपित
मुंबईच्या गोलंदाजांपुढे चेन्नईच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट; पहिल्यांदाच झाला १० विकेट्सने पराभव
ट्रेंडिंग लेख –
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!