Loading...

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला येणार धार, संघात सामील झालाय हा दिग्गज गोलंदाज

पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सने प्लेअर्स ट्रेडिंगच्या माध्यमातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मुंबई इंडियन्सकडे ट्रान्सफर केले आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या 13 व्या मोसमात बोल्ट मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.

Loading...

आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असलेल्या बोल्टने 2015 मध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने 2016 च्या मोसमातही तो हैद्राबादकडून खेळला. त्यानंतर 2017 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला.

2018 मध्ये बोल्टला दिल्लीने आपल्या ताफ्यात घेतले. पण आता तो 2020च्या आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना दिसेल. मुंबई इंडियन्स हा बोल्टचा आयपीएलमधील चौथा संघ असेल.

Loading...
Loading...

त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये मागील 5 मोसमात 33 सामने खेळताना 38 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दिल्लीकडून खेळताना त्याने मागील दोन मोसमात मिळून 19 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत.

याआधी आयपीएल 2020 साठी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सबरोबर शेरफेन रुदरफोर्डचे ट्रेडिंग केले होते. रुदरफोर्डच्या बदल्यात दिल्लीने मुंबईकडून मयंक मार्कंडेला संघात सामील करुन घेतले आहे.

अंकित राजपूत खेळणार राजस्थान रॉयल्सकडून –

त्याचबरोबर किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सबरोबर वेगवान गोलंदाज अंकित राजपूतचे ट्रेडिंग केले आहे. त्यामुळे आता राजपूत 2020 आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे. त्याने आत्तापर्यंत 23 आयपीएल सामने खेळले असून यामध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत.

Loading...
You might also like