---Advertisement---

ट्रेंट बोल्टने रचला इतिहास! इंग्लंडच्या पाच विकेट्स घेत बनला न्यूझीलंडचा सर्वोत्तम गोलंदाज

Trent Boult
---Advertisement---

बुधवारी (13 सप्टेंबर) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना खेळला गेला. द ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 368 धावा कुटल्या. इंग्लंडने मोठी धावसंख्या केली असली, तरी न्यूझीलंडचा दिग्गज ट्रेंट बोल्ट याचे प्रदर्शन देखील कौतुकास्पद ठरले. बोल्टने इंग्लंडच्या पाच विकेट्स घेतल्या आणि मोठा विक्रम नावावर केला.

ट्रेंट बोल्ट (Trent Boult) मागच्या वर्षी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी असलेल्या करारातून मुक्त झाला. पण आघामी वनडे विश्वचषकासाठी त्याला संघ व्यवस्थापनाकडून संघात सामीत केले गेले. इंग्लंडविरुद्धच्या या वनडे मालिकेतून बोल्टने संघात पुनरागमन केले आणि चांगले प्रदर्शन देखील केले. बुधवारी बोल्टने 9.1 षटकात 51 धावा खर्च 5 विकेट्स घेतल्या. वनडे कारकिर्दीतील बोल्टने सहाव्यांदा एका इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. बोल्ट न्यूझीलंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा फलंदाज ठरला आहे.

न्यूझीलंडसाठी सर्वाधिक वेळा वनडे क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत बोल्ट पहिल्या क्रमांकावर आला आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर रिचर्ड हॅडली यांचे नाव आहे. हॅडली यांनी वनडे कारकिर्दीत 5 वेळा पाच विकेट्सचा हॉल घेतला आहे. यादीत तिसरा क्रमांक शेन बाँड यांचा आहे, ज्याने वनडे कारकिर्दीत 4 वेळा पाच विकेट्सचा हॉल नावावर केला आहे.

न्यूझीलंडसाठी सर्वाधिक वेळा 5 विकेट्स हॉल नावावर करणारे गोलंदाज –
ट्रेंट बोल्ट – 6
रिचर्ड हॅडली – 5
शेन बाँड – 4

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, रीस टोपले.

न्यूझीलंड: विल यंग, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी, विकेट), ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, बेन लिस्टर.

महत्वाच्या बातम्या – 
बेन स्टोक्सची सर्वोत्तम वनडे खेळी! कमबॅकनंतर तिसऱ्याच सामन्यात करणार होता द्विशतक 
BREAKING! नसीम शहा आशिया चषकातून बाहेर, ‘या’ वेगवान गोलंदाजाचे होणार पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---